भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
राज्यातील २० हजार ते दीड लाख चौरस मीटरपर्यंतच्या सर्वच गृहप्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या समितीऐवजी राज्य…
गरिबी, स्त्रियांवरील अत्याचार आणि कुपोषण यासंबंधी जनअर्थसंकल्पाद्वारे अभ्यासपूर्ण मागण्या करण्यात आलेल्या ‘सीएचएचडीआर’च्या जनअर्थसंकल्पाचे प्रकाशन झाले.
वक्फसंदर्भातील अहवाल बुधवारी संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) १६ विरुद्ध ११ मतांनी स्वीकारला. हा अहवाल गुरुवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्द…