चंद्रकांत खैरे Photos
चंद्रकांत खैरे हे महाराष्ट्रातील राजकीय नेते असून त्यांचा जन्म १ जानेवारी १९५२ रोजी औरंगाबाद ( आताचे छत्रपती संभाजीनगर ) जिल्ह्यात झाला. त्यांनी १२ पर्यंतचं शिक्षण पूर्ण केले आहे. राजकीय नेता, सामाजिक कार्यकर्ता ते उद्योगपती अशी चंद्रकांत खैरे यांची ओळख आहे. चंद्रकांत खैरे यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते होते.
चंद्रकांत खैरे यांनी १९८५ मध्ये आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून ते आजपर्यंत ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. १९८५ साली त्यांनी औरंगाबादमध्ये शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली. १९९० मध्ये त्यांनी औरंगाबाद पश्चिममधून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा २९ हजार १५५ मतांनी विजय झाला. १९९५ मध्ये ते पुन्हा एकदा आमदार झाले. तसेच १९९७ साली ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री बनले.
पुढे १९९९ साली त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांनी निवडणुकीत त्यांनी माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचा पराभव केला. १९९९ ते २०१९ यादरम्यान, सलग चार वेळा औरंगाबादचे खासदार होते. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा परावभ झाला. चंद्रकांत खैरे सक्रीय राजकारणात असून ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत.
Read More