चंद्रपूर हा पूर्व विदर्भातील प्रमुख जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १० हजार ४९० चौरस किमी आहे. चंद्रपूर (Chandrapur) हे पूर्वी गोंड राजाची राजधानी होती. चंद्रपूर जिल्हा खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. येथे कोळसा आणि चुन्याच्या खाणी आहेत. चंद्रपूरच्या पूर्वेस गडचिरोली, पश्चिमेस यवतमाळ, उत्तरेस नागपूर आणि दक्षिणेस आंद्रप्रदेश आहे.
उद्योग आणि पर्यटनाच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हा (Chandrapur District) अतिशय महत्त्वाचा आहे. येथील कोळसा खाणी, कागद आणि सिमेंट उद्योग असे प्रमुख उद्योग आहे. पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि बाबा आमटेंचं आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यात आहे. Read More
विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास मूल तालुक्यातील कोसंबी गावात भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा…
चंद्रपूर जिल्ह्यातील सहांपैकी पाच मतदारसंघांत भाजप-काँग्रेसमध्येच थेट सामना असून राजुरा या एकमेव मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शेतकरी संघटना, अशी लढत आहे.