चंद्रशेखर बावनकुळे Photos

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) हे महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४, २००९ आणि २०१४ असे सलग तीन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कामकाज पाहिलं आहे.


२६ डिसेंबर २०१४ रोजी त्यांची नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना भाजपाने २०१९ विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं नाही. पण २०२२ मध्ये महाराष्ट्र भाजपाचं (BJP) प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात आलं. तसंच, ते विधान परिषदेचेही आमदार आहेत. बिगरराजकीय पार्श्वभूमी असलेल्या शेतकरी कुटुंबात बावनकुळे यांचा जन्म झाला. नागपूरजवळ असलेले कोराडी येथील विज्ञान शाखेत त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि प्रथम वर्ष पूर्ण केले. वर्ष २०२२ ला बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्ष मजबूत करण्याच्या दृष्ठीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला.


Read More
Maharashtra's Deputy Chief Minister attended the celebrations at the BJP office in Mumbai
12 Photos
Photos : महाविजयाच्या आनंदात देवेंद्र फडणवीसांनी तळली जिलेबी; भाजपा कार्यालयातील जल्लोषाचे फोटो व्हायरल

देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जबरदस्त विजयाच्या आनंदात भाजपा कार्यालयात आज जिलेबी तळली आहे. पाहा जल्लोषाचे फोटो

chandrashekhar bawankule
12 Photos
Photos : ‘मिशन बारामती’साठी भाजपाची तगडी रणनीती; निर्मला सितारामणही उतरणार मैदानात, बावनकुळेंचा एल्गार

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर असून तिथे बोलताना बावनकुळेंनी भाजपाच्या ‘मिशन बारामती’चीही घोषणा केली.

ताज्या बातम्या