चांद्रयान ३ News
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization) – लघुस्वरुपात ‘इस्रो’ (ISRO) ही भारतातील प्रमुख शासकीय संस्था आहे. या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट अंतराळ संशोधन करणे हे आहे. या संस्थेद्वारे अंतराळाशी संबंधित अनेक प्रकल्प राबवले जातात. यामध्ये चांद्रायन, मंगळयान तसेच आदित्य एल-१ प्रकल्प, गगनयान प्रकल्प यांसारख्या काही प्रकल्पांचा समावेश होतो. इस्रोने काही महिन्यापूर्वी चांद्रयान ३ (chandrayaan 3)हे अवकाश यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवले. चंद्राच्या या भागावर अंतराळयान पाठवणारा भारत हा पहिला आणि एकमेव देश आहे. २००८ मध्ये भारताने पहिल्यांदा चंद्रावर स्वारी केली. तेव्हा चांद्रयान १ हे चंद्राच्या जवळ पाठवण्याच्या प्रयत्नांना भारताला यश मिळाले. पुढे चांद्रायन २ या मोहिमेला सुरुवात झाली.
२०१९ मध्ये तांत्रिक बिघाडामुळे शेवटच्या क्षणी चांद्रायन २ मोहीम अयशस्वी ठरली. २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या या अंतराळयानाचे लॅंडर आणि रोव्हर चंद्रावर पोहचण्याआधीच क्रॅश झाले. या घटनेमुळे खचून न जाता इस्रोमधील वैज्ञानिकांनी चांद्रयान ३ प्रकल्पाची तयारी करायला सुरुवात केली. इतर संशोधन संस्था आपल्या अंतराळ संशोधनामध्ये बक्कळ पैसे करत असताना इस्रोने दिलेल्या बजेटमध्ये चांद्रयान ३ मोहिमेची पूर्वतयारी पूर्ण केली. १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २.३५ वाजता चांद्रयान ३ चे श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण करण्यात आले.
या यानामध्ये विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान नावाच्या रोव्हरचा समावेश करण्यात आला होता. हे लॅंडर आणि रोव्हर अपयशी ठरलेल्या चांद्रयान २ मध्येही होते. चंद्रावर उतरताना झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न चांद्रयान ३ मध्ये केला होता. १४ जुलै रोजी भारतातून प्रक्षेपित झालेले चांद्रयान ३ हे अवकाशयान २३ ऑगस्ट २०२३ रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले. चांद्रायन ३ मोहीम फत्ते झाल्याने भारताचे अंतराळ संशोधनात मोठे नाव झाले.Read More