Page 10 of चावडी News
हवामान विभागाच्या अंदाजावर त्यांनी तिरकस शैलीत बोट ठेवले. हा विभाग जे अंदाज वर्तवतो, त्याच्या अनेकदा विपरीत घडल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ आदी नेत्यांचीच भाजपमध्ये चलती दिसते. मुंबईतील भाजप कार्यक्रमांमध्ये हेच चेहरे मुख्यत्वे दिसतात.
उद्घाटन संपल्यानंतर संयोजकांनी समूह छायाचित्र काढण्याचा आग्रह धरल्याने दादांना मुखपट्टी काढावी लागली.
राजकारणात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे आपल्यापुढे कोणाला जाऊ देत नाही. दुसरे सोबत असणाऱ्याला दोन पावले पुढे नेतात.
चंद्रकांतदादांच्या या धमकीचा मतदारांवर उलट परिणाम तर होणार नाही ना, ही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटणारी भीतीही रास्तच आहे.
मंत्री झाल्यानंतर अनेक जण ओळख काढीत जवळ येतात, कामासाठी आले तर त्यात वावगे वाटायचे काहीच कारण नाही.
७४ मिनिटांच्या अजितदादांच्या अर्थसकल्पीय भाषणात फार कमी वेळा सत्ताधारी बाकांवरून स्वागत केले गेले.
प्रसिद्धी कशी मिळते याचा धडा भालेराव किंवा दौंड यांच्यापासून आमदारांना बहुधा घ्यावा लागेल.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुंबईत आले व उभयतांनी भाजपच्या विरोधात रणिशग फुंकले.
पुढे दोन दिवस स्मारकवादाचा धुरळा उडाल्यावर हृदयनाथ मंगेशकर यांनीच शिवाजी पार्क मैदानात स्मारक नको, अशी भूमिका स्पष्ट केली आणि वादावर…
गाव अवघे सात-आठशे उंबऱ्याचं. डोंगराळ शिवारच जास्त. दसरा-दिवाळीपर्यंत अख्खं शिवार दिसणारं शिवार थंडी वाढू लागली की पिवळं पडून कुसळाच व्हायचं.