छगन भुजबळ

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांनी मुंबईमधील एका अभियांत्रिकी विद्यालयामधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ते शेती व त्याच्याशी संबंधित व्यवसाय करत होते. त्यांना लहानपणापासून राजकारणामध्ये रुची होती. शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी राजकारणामध्ये पदार्पण केले.

१९७३ मध्ये ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे १९९१ साली त्यांनी शिवसेना (Shivsena) सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ यांनी पुन्हा पक्षांतर केले. माझगाव मतदारसंघातून ते १९८५ आणि १९९० या वर्षांमध्ये निवडून आले आहेत. येवला मतदारसंघातून निवडून येत त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळाले. १९९९ ते २००३ या काळामध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन पदांची जबाबदारी होती. २००४ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.

२००८ ते २०१० या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचा जामीन मंजूर झाला. महाविकास आघाडी सरकार असताना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार या विभागाचे ते मंत्री होते.
Read More
chhagan Bhujbal latest marathi news
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही! छगन भुजबळ यांची अजित पवारांवर टीका

अधिवेशनास सुरुवात झाल्यावर अजित पवार – छगन भुजबळ समोरासमोर आले. मात्र दोघांत कोणतेही संभाषण झाले नाही.

Praful Patel on Chhagan Bhujbal
“तुम्ही ज्या शब्दांचा वापर करताय ते…”, भुजबळांबाबत प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांची नाराजी टोकाची…”

Praful Patel at NCP Convention : शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन चालू आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : नाराज असलेले छगन भुजबळ अधिवेशनाला हजर; प्रफुल्ल पटेलांचा उल्लेख करत म्हणाले…

महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने पक्षाचे वजनदार नेते, आमदार छगन भुजबळ नाराज आहे. भुजबळ यापूर्वीच्या पक्षाच्या कार्यक्रमांना तसंच, पंतप्रधानांच्या मुंबईतील…

chhagan Bhujbal latest marathi news
Chhagan Bhujbal : “आज हवा तुम्हारी हैं, कल का तुफान…” छगन भुजबळांचा इशारा नेमका कोणाला?

Chhagan Bhujbal on Manoj Jarange : आरक्षण म्हणजे हमखास शासकीय नोकरी, असा त्यांचा समज असून उपोषण म्हणजे त्यांचा छंद असल्याची…

What did Chhagan Bhujbal say about the Ladki Bhahin scheme
Chhagan Bhujbal: “ज्या नियमात बसत नाहीत त्यांनी…”

लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी आपली नावं मागे घ्यावीत, असं आवाहन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”

Ladki Bahin Yojana Scrutiny : लाडकी बहीण योजनेवरून लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : ‘अनेकांचे पतंग कापले, पण माझा पतंग कुणीही कापलेला नाही’, छगन भुजबळांचं सूचक विधान

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ आज त्यांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सूचक विधान केलं.

Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान

Ladki Bahin Yojana : आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं भाष्य केलं आहे.

manik kokate chhagan bhujbal
भुजबळांविषयी न बोलण्याचा माणिक कोकाटे यांना अजित पवार गटाचा आदेश

कोकाटे आणि भुजबळ यांच्यातील राजकीय संबंध कधीच मित्रत्वाचे राहिलेले नाहीत. कोणत्या ना कोणत्या कारणाने कोकाटे हे भुजबळ यांच्यावर टीका, आरोप…

Shortage of buses at Yeola and Lasalgaon depots Chhagan Bhujbal demands to action
येवला, लासलगाव आगारांना बसेसचा तुटवडा, कार्यवाही करण्याची छगन भुजबळ यांची मागणी

येवला आणि लासलगाव या दोन्ही आगारांना बसेसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने या प्रकरणात अखेर ज्येष्ठ नेते…

loksatta chavadi political drama in Maharashtra
चावडी: भुजबळ तेव्हा आणि आता फ्रीमियम स्टोरी

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगावच्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक…

What sharad pawar wrote on that paper chhagan bhujbal says
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी त्या कागदावर काय लिहून दिलं होतं? छगन भुजबळांनी सांगितला पवारांचा ‘तो’ संदेश; म्हणाले…

Chhagan Bhujbal: मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ आणि शरद पवार हे ३ जानेवारी रोजी एकाच मंचावर आले होते.…

संबंधित बातम्या