छगन भुजबळ News

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांनी मुंबईमधील एका अभियांत्रिकी विद्यालयामधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ते शेती व त्याच्याशी संबंधित व्यवसाय करत होते. त्यांना लहानपणापासून राजकारणामध्ये रुची होती. शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी राजकारणामध्ये पदार्पण केले.

१९७३ मध्ये ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे १९९१ साली त्यांनी शिवसेना (Shivsena) सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ यांनी पुन्हा पक्षांतर केले. माझगाव मतदारसंघातून ते १९८५ आणि १९९० या वर्षांमध्ये निवडून आले आहेत. येवला मतदारसंघातून निवडून येत त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळाले. १९९९ ते २००३ या काळामध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन पदांची जबाबदारी होती. २००४ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.

२००८ ते २०१० या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचा जामीन मंजूर झाला. महाविकास आघाडी सरकार असताना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार या विभागाचे ते मंत्री होते.
Read More
Chhagan Bhujbal on Phule Movie
Chhagan Bhujbal : “काही कर्मठ ब्राम्हण जोतिबांविरोधात होते”, छगन भुजबळांचं वक्तव्य; म्हणाले, “फुले चित्रपटातील एकही सीन…”

Chhagan Bhujbal on Phule Movie : ‘फुले’ चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली…

chhagan bhujbal reacts on phule film getting oppose
‘फुले’ चित्रपटाला विरोध अनाठायी, महात्मा फुले यांचा लढा ब्राह्मण्याविरोधात; छगन भुजबळ यांची भूमिका

चित्रपटाला अनाठायी विरोध करण्यापेक्षा त्या वेळचा इतिहास समजून घेतला पाहिजे,’ अशी भूमिका महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री…

Chhagan Bhujbal On Udayanraje Bhosale
Chhagan Bhujbal : महात्मा फुलेंनी मुलींची शाळा सुरू करताना कुणाची प्रेरणा घेतली? उदयनराजेंच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांनी…”

Chhagan Bhujbal : उदयनराजे भोसले यांच्या विधानावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

ajit pawar chhagan bhujbal
Ajit Pawar : “मी फक्त आमदार, आंदोलन करायला मोकळा”, भुजबळांच्या या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “काही गोष्टी…”

Mahatma Phule Birth Anniversary: महात्मा फुले स्मारकासाठी लोक जमीन द्यायला तयार असून अधिकारी टोलवाटोलवी करतात, असा आरोप भुजबळांनी केला आहे.

Former Minister Chhagan Bhujbal statement that politics is like wrestling tactics pune print news
कुस्तीप्रमाणे राजकारणातही डावपेच आणि धोबीपछाड; माजी मंत्री छगन भुजबळ यांचे वक्तव्य

‘राजकीय आयुष्याच्या वाटचालीत नक्की कोण कोणाचा प्रतिस्पर्धी हे सांगणे अवघड असते. कोण कोणाला कधी धोबीपछाड करेल, हे सांगता येत नाही.

छगन भुजबळ यांच्याकडून अजित पवार-जयंत पाटील भेटीचे समर्थन

राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अर्ध्या तासापेक्षाही अधिक वेळ चर्चा झाली.

Chhagan Bhujbal news in marathi
गोदावरीत जाणारे सांडपाणी थांबवावे : छगन भुजबळ यांची मागणी

गोदापात्रात शहर परिसरातील उद्योगांसह निवासी भागातील सांडपाणीही मिसळत आहे. पावसाळी पाण्याच्या वाहिन्यांमधूनही गोदावरी मध्ये सांडपाणी जाते.

NCP leader Chhagan Bhujbal praise ajit pawar
पक्षांतंर्गत घडामोडींमुळे छगन भुजबळ यांचा सावध पवित्रा

पक्षात एकाकी पडलेल्या भुजबळांची पावले तिसऱ्या बंडाच्या अर्थात भाजपच्या दिशेने पडत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. परंतु, तूर्तास तो विषयही थांबला…

ncp leader chhagan bhujbal criticized mahayuti over justice for backward classes
मागासवर्गीयांना न्यायासाठी विलंब का ? छगन भुजबळ यांचा सरकारला सवाल

मागास जातीतल्या लोकांना न्याय मिळण्यास विलंब का लागतो, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी…

What Chhagan Bhujbal Said?
Chhagan Bhujbal : “धनंजय मुंडेंनी नैतिकतेला धरुन राजीनामा दिला आहे, पुढचा निर्णय…”; छगन भुजबळ यांचं वक्तव्य

धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या