छत्रपती संभाजीराजे Photos
कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून कोल्हापुरातून (Kolhapur) लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र ते पराभूत झाले होते. यानंतर २०१४ मध्ये राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर २०१६ साली त्यांना राज्यभेत राष्ट्रपतीनियुक्त सभासद म्हणून खासदारकी मिळाली होती.
राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर, संभाजीराजे यांनी सर्व राजकीय पक्षांकडून पाठिंबा मागताना अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या चळवळीतही ते सक्रीय आहेत. १२ मे २०२२ रोजी त्यांनी स्वराज्य संघटना या सामाजिक संस्थेची स्थापना केली.
Read More