छत्रपती शाहू महाराज Videos
काँग्रेस नेते छत्रपती शाहू शहाजी हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा त्यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव केला. छत्रपती शाहू शहाजी यांचा जन्म ७ जानेवारी १९४८ रोजी कोल्हापूरच्या राजघराण्यात झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ वे वंशज आहेत, तर राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचे ते पणतू आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी छत्रपती शाहू शहाजी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कोल्हापूर लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षांनी महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू शहाजी यांना पाठिंबा जाहीर केला होता. छत्रपती शाहू शहाजी यांनी तब्बल १,५४,९६४ मताधिक्क्याने महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव केला. छत्रपती शाहू शहाजी हे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचे वडिल आहेत.
Read More