छत्तीसगड निवडणूक २०२३ News

सध्या छत्तीसगड हा काँग्रेसचा गड आहे. या राज्यामध्ये दोन कोटींपेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र आहेत अशी माहिती समोर आली आहे. दोन टप्प्यांमध्ये मतदान होणाऱ्या पाच राज्यांमध्ये छत्तीसगडचा समावेश करण्यात आला आहे.


छत्तीसगडमधील विधानसभेची मुदत पुढच्या वर्षी ३ जानेवारी २०२४ रोजी पूर्ण होणार आहे. त्याआधी ७ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या दहा दिवसांमध्ये छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागांसाठी मतदान होणार आहे. या जागांमध्ये १० जागा अनुसूचित जाती, तर २९ जागा अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मतदानाचा निकाल (Chhattisgarh Election 2023 Result) ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर केला जाईल असे म्हटले जात आहे.


२०१८ मध्ये काँग्रेस पक्षाने छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये (Chhattisgarh Assembly Election 2023) ९० पैकी ६८ जागा जिंकत बाजी मारली होती. तर भाजपाला १५ जागा मिळवत तिथे दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या राज्यामध्ये सध्याच्या घडीला काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन पक्ष विजयाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. असे असले तरीही, छत्तीसगडच्या राजकारणामध्ये पदार्पण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आम आदमी पार्टी या पक्षाकडे सर्वांचे लक्ष आहे.


Read More
bhupesh baghel
छत्तीसगडमधील दारूण पराभवानंतर आता भाजपाच्या बालेकिल्ल्यातच थेट दोन हात करण्याचे आव्हान, काय करणार भूपेश बघेल?

याआधीही माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे पुत्र अभिषेक सिंह आणि त्याआधी मधुसूदन यादव या मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीबद्दल…

chhattisgarh
एक ओबीसी, तर एक हिंदुत्वाचा चेहरा; भाजपाने छत्तीसगडला दिलेले दोन उपमुख्यमंत्री कोण आहेत?

विष्णू देव साय यांची १० डिसेंबर रोजी छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. मात्र, तोपर्यंत शर्मा आणि साव यांची…

Vishnu Deo Sai
चार वेळा खासदार, केंद्रात मंत्री, छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णुदेव साय कोण आहेत?

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सुरगुजा प्रदेशातील पूर्ण १४ जागा जिंकलेल्या आहेत.

Vishnu Deo Sai New CM
छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी विष्णू देव साय यांची निवड; आदिवासी नेते निवडीमागचे भाजपाचे राजकारण काय?

Chief Minister of Chhattisgarh : भाजपाने छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी आदिवासी नेते विष्णू देव साय यांची निवड केली आहे.

Narendra Modi Amity Shah
भाजपाने विधानसभेच्या रिंगणात उतरवलेल्या २१ खासदारांपैकी कितीजण जिंकले, पराभूत झालेल्यांचं पुढे काय होणार? प्रीमियम स्टोरी

भाजपाने राजस्थान आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी सात, छत्तीसगडमध्ये चार आणि तेलंगणातल्या ३ खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं.

prashant kishore explained how bjp won
प्रशांत किशोर यांनी सांगितली भाजपाच्या विजयाची चार कारणं, काँग्रेसला सल्ला देत म्हणाले…

प्रशांत किशोर यांनी काही वेळापूर्वी बिहारमध्ये प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, तुम्हाला कोणालाही हरवायचं असेल तर तुम्हाला त्याची ताकद…

Madhya Pradesh Rajasthan Chhattisgarh Telangana Election
राजस्थान ते तेलंगणा; चार राज्यांच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदाच्या ‘सिंहासनाचा खेळ’ काय?

देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल लागला असला, तरी सत्तासंघर्ष येथेच थांबलेला नाही. आता मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार याची राजकीय चुरस…

Biggest win for BJP highest number of seats since state formation in Chhattisgarh
भाजपचा सर्वात मोठा विजय, छत्तीसगडमध्ये राज्य स्थापनेनंतर सर्वाधिक जागा; काँग्रेसला अनपेक्षितपणे धक्का

छत्तीगड राज्यनिर्मिती २००० मध्ये झाल्यानंतर आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय भाजपने यंदा मिळवला आहे.

Chhattisgarh Election Result 2023 Updates in Marathi
Chhattisgarh Election : भाजपाकडून छत्तीसगडमध्ये सत्तापालट, पाहा कोणते एग्झिट पोल खरे ठरले?

Chhattisgarh Legislative Assembly Election Result 2023 Updates : छत्तीसगडमध्ये भाजपाने ५६ तर काँग्रेसने ३५ जागा जिंकल्या आहेत, एक जागा गोंडवाना…

pm narendra modi speech delhi
“या निकालांमधून काँग्रेससाठी हा धडा आहे की…”, नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला; म्हणाले, “माझा त्यांना सल्ला आहे की…!”

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, “केंद्र सरकारच्या गरीब कल्याणच्या योजना आणि त्यासाठी पाठवलेल्या निधीच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर जो…

Eshwar Sahudefeated 7 time INC MLA Sri Ravindra Choubey .
भाजपाचा हिंदुत्वाचा प्रयोग यशस्वी! दंगलीत मुलगा गमावलेल्या शेतकऱ्याचा विजय; काँग्रेसच्या मंत्र्याला केलं पराभूत

साजा या ठिकाणाहून ईश्वर साहू भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढले आणि जिंकले