छत्तीसगड निवडणूक २०२३ Photos
सध्या छत्तीसगड हा काँग्रेसचा गड आहे. या राज्यामध्ये दोन कोटींपेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र आहेत अशी माहिती समोर आली आहे. दोन टप्प्यांमध्ये मतदान होणाऱ्या पाच राज्यांमध्ये छत्तीसगडचा समावेश करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील विधानसभेची मुदत पुढच्या वर्षी ३ जानेवारी २०२४ रोजी पूर्ण होणार आहे. त्याआधी ७ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या दहा दिवसांमध्ये छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागांसाठी मतदान होणार आहे. या जागांमध्ये १० जागा अनुसूचित जाती, तर २९ जागा अनुसूचित जमातीच्या प्रतिनिधींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मतदानाचा निकाल (Chhattisgarh Election 2023 Result) ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर केला जाईल असे म्हटले जात आहे.
२०१८ मध्ये काँग्रेस पक्षाने छत्तीसगड विधानसभा निवडणुकीमध्ये (Chhattisgarh Assembly Election 2023) ९० पैकी ६८ जागा जिंकत बाजी मारली होती. तर भाजपाला १५ जागा मिळवत तिथे दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या राज्यामध्ये सध्याच्या घडीला काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन पक्ष विजयाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. असे असले तरीही, छत्तीसगडच्या राजकारणामध्ये पदार्पण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आम आदमी पार्टी या पक्षाकडे सर्वांचे लक्ष आहे.
Read More