मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान Photos

शिवराज सिंह चौहान हे भारतीय राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. तसेच ते देशाचे विद्यमान कृषीमंत्री आहेत. शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीसुद्धा राहिले आहेत. त्यापूर्वी १९९१ ते २००५ या काळात ते विदिशी लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. शिवराज सिंह चौहान यांच्या जन्म ५ मार्च १९५९ रोजी मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील जैत या गावात झाला.


शिवराज सिंह चौहान यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून झाली. १९८८ साली त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चामध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९९१ मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. २००५ पर्यंत ते विदिशा मतदारसंघाचे खासदार होते. पुढे २००५ ते २०१८ आणि २०२० ते २०२३ या काळात ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. २०२४ च्या लोकसभेत भाजपाने त्यांना विदिशामधून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. ते सध्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये कृषीमंत्री आहेत.


Read More
Election results | Shivraj Singh Chouhan MP Election Results
7 Photos
Madhya Pradesh Results: शिवराजसिंह चौहान यांच्या ‘या’ योजनेमुळे मध्य प्रदेशात पुन्हा कमळ फुलले

निकालाचा कल पाहता, पुन्हा एकदा मध्य प्रदेशातील जनतेवर शिवराजसिंह यांची जादू चालल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

ताज्या बातम्या