२८ जुलै २०२२ ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहॅम (Birmingham 2022) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) २२व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले. बर्मिंगहॅम शहरातील अलेक्झांडर स्टेडियमवर ही स्पर्धा पार खेळवली जात आहे. गेल्या २० वर्षांत इंग्लंडमध्ये तिसऱ्यांदा या खेळांचे आयोजन होत आहे.
१९३० मध्ये सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची (CWG 2022) ही २२वी आवृत्ती आहे. पहिली स्पर्धा १९३० मध्ये कॅनडातील हॅमिल्टन शहरात आयोजित करण्यात आली होते. त्यावेळी ११ देशांतील सुमारे ४०० खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला होता. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २८३ वेगवेगळ्या इव्हेंट्सचा समावेश आहे. विविध देशांतील ७२ संघ विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी सुमारे सहा हजार ५०० खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ बर्मिंगहॅममध्ये दाखल झाले आहेत.
भारत १८ व्यांदा या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८१ सुवर्ण, १७३ रौप्य आणि १४९ कांस्य पदके जिंकली आहेत. २००२ मँचेस्टर गेम्सपासून प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांच्या बाबतीत भारत पहिल्या पाच देशांमध्ये समाविष्ट होत आला आहे. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games 2022) ही, २०१२ च्या लंडन ऑलिंपिकनंतर ब्रिटनमधील सर्वात महागडी स्पर्धा असल्याचे म्हटले जात आहे. बर्मिंगहॅममध्ये आयोजित खेळांसाठी ७७८ दशलक्ष पौंड (सुमारे ७४ अब्ज) खर्च झाला आहे.
Commonwealth Games Year Ender 2022: हे वर्ष अॅथलेटिक्ससाठी चांगले गेले. राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच लॉन बॉलमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. भारतासाठी सर्वाधिक…