काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
rahul gandhi 10 janpath house
“माझ्या वडिलांचं इथेच निधन झालं, त्यामुळे या घराचा…”, राहुल गांधींनी १०, जनपथबाबत केलं विधान!

राहुल गांधींनी यावेळी सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांच्यासाठी स्वत: दोन दिवे बनवले व दिवे बनवणाऱ्या कुटुंबासमवेत कामही केलं!

dgp Rashmi Shukla
रश्मी शुक्ला यांना महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांकडून का होतेय? झारखंड पोलीस महासंचालकांचा संदर्भ काय? प्रीमियम स्टोरी

निवडणूक आयोगाच्या परिपत्रकातील सहा क्रमांकाच्या मुद्द्यातील पाच या उपकलमानुसार निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील त्रुटीबद्दल फौजदारी कारवाई करण्यात आलेल्या वा तत्सम प्रलंबित असलेल्या…

Priyanka Gandhi
Priyanka Gandhi: प्रियंका गांधींची प्रचार मोहीम ३ नोव्हेंबरपासून

प्रियंका गांधी ४ नोव्हेंबर रोजी कलपेट्टा आणि सुल्तान बाथरी विधानसभा मतदारसंघातील पाच ठिकाणी होणाऱ्या सभांना संबोधित करणार आहेत.

maharashtra assembly election 2024 congress aspirants upset
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता; अल्पसंख्यांक जागा शिवसेनेला गेल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक नाराज

गेली ४४ वर्ष कॉंग्रेसमध्ये असलेल्या रवी राजा यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे आता कॉंग्रेसमधील नाराज कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले आहेत.

BJP Rajesh Khatgavkar vs Congress Minal Patil Naigaon Assembly Constituency
Naigaon Assembly Constituency : जुन्या भागीदारांचे राजकीय वारस आमने-सामने !

भाजपाचे विद्यमान आमदार राजेश संभाजी पवार यांच्याविरुद्ध खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे येथील राजकीय…

Maharashtra reservation Nana Patole statements fact check
काँग्रेसचा आरक्षणाला विरोध! नाना पटोलेंनी मांडली खळबळजनक भूमिका? Viral Video मागील सत्य काय? वाचा

Nana Patole Fact Check : नाना पटोले यांनी आरक्षणाबाबत खरंच असं कोणतं विधान केलं आहे का? याबाबतचे सत्य जाणून घेऊ…

Maharashtra congress ips Rashmi Shukla
रश्मी शुक्लांना हटविण्याची काँग्रेसची मागणी

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तात्काळ पदावरून दूर करावे, या मागणीचा पुनरुच्चार काँग्रेसने केला आहे. याबाबतचे पत्र प्रदेशाध्यत्र नाना पटोले…

BJP Congress will contest assembly elections 2024 on 36 seats In Vidarbha print politics news
विदर्भात भाजप-काँग्रेसमध्ये ३६ जागांवर थेट लढत

राज्यात विभागनिहाय विधानसभा मतदारसंघांचा विचार करता सर्वाधिक ६२ जागा असलेल्या विदर्भात विजय मिळाला की राज्यात सत्तास्थापन करता येते, असा गेल्या…

Eknath shinde nana patole
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला दणका, कोल्हापुरातील विद्यमान आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

Eknath Shinde vs Congress : एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमांद्वारे या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे.

Rajasthan Govt Book Controversy
Godhra : गोध्रा प्रकरणात हिंदूंना गुन्हेगार ठरवणारा उल्लेख असलेलं पुस्तक राजस्थान सरकारने घेतलं मागे, मंत्री मदन दिलावर म्हणाले, “काँग्रेस..”

गोध्रा प्रकरणाबाबत चुकीची माहिती असलेलं पुस्तक राजस्थान सरकारने घेतलं मागे

ravi raja who joined bjp said congress does not consider the merit
Ravi Raja join BJP: काँग्रेसचा हात सोडत भाजपाला साथ; रवी राजांनी दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबईत ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रवी राजा ( Ravi Raja ) यांनी भाजपात प्रवेश केला आहे.…

congress name pravin padvekar for chandrapur assembly constituency elections
काँग्रेसकडून सामान्य कार्यकर्त्याला न्याय, भाजपकडून अन्याय; चंद्रपुरात चर्चा

जिल्ह्यात भाजपकडून इतर पक्षांतून आलेल्यांनाच पदे दिली जातात, निष्ठावान कार्यकर्ते केवळ सतरंज्याच उचलतात, अशी चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या