काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
congress is finish from solapur district because of shinde family politics
सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार

२५-३० वर्षांत हा बालेकिल्ला ढासळत गेला आणि मावळत्या विधानसभेत सोलापुरात काँग्रेसकडे केवळ एकच जागा होती. आता ही एकमेव जागा देखील…

Armory Assembly, Ramdas Masram, Armory,
गडचिरोलीत एक दशकानंतर काँग्रेसला संधी, आरमोरीची जागा गमावल्याने भाजपला धक्का

विधानसभा निवडणूक निकालात सर्वत्र महायुतीचा बोलबाला असताना गडचिरोलीतील आरमोरी मतदारसंघात काँग्रेसने मुसंडी मारल्याने भाजपला धक्का बसला आहे.

maharashtra assembly election result central nagpur BJP strategy against division of Halba samaj votes
मध्य नागपुरात हलबांच्या मतविभाजनाचा भाजपचा फायदा

देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनी जाहीर सभेत हलबा समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यावर समाजाने विश्वास…

akola west congress party workers attacked police officer after congress win
विजयी जल्लोषात पोलिसालाच धक्काबुक्की, काँग्रेसच्या विजयानंतर अकोल्यात…; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला. निकाल जाहीर होताच जल्लोषात तरुणांनी उन्माद करून चक्क बंदोबस्तातील पोलिसालाच धक्काबुक्की केल्याचा…

Yavatmal District Assembly Election Results,
यवतमाळ भाजपने दोन जागा हाताने गमावल्या! काँग्रेस, शिवसेना उबाठाने खाते उघडले

गेल्या दशकात जिल्हा काबीज केलेल्या भाजपला यावेळी विधानसभा निवडणुकीत आपल्या सर्व जागा राखता आल्या नाहीत. दोन जागांवर भाजप उमेदवार पराभूत…

bjp candidate winners list
Maharashtra Election Result 2024 BJP Candidates Defeated: भाजपाचा विजयरथ १६ ठिकाणी रोखणारे ‘ते’ उमेदवार कोण? ११ ठिकाणी काँग्रेसशी झाली थेट लढत!

16 Constituencies Where BJP Candidates were Defeated: भाजपा उमेदवारांचा महाराष्ट्रभर विजय होत असताना १६ मतदारसंघांमध्ये भाजपाचा पराभव झाला.

maharashtra Assembly Election 2024 South Maharashtra Mahayuti wins Hindutva propaganda print politics news
दक्षिण महाराष्ट्र: वाटचाल भगव्याकडे..

या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारंपरिक पोत पूर्णत: बदलला आहे. आक्रमक हिंदुत्वाच्या प्रचाराने नव्या पिढीला आकर्षित केले आहे…

Maharashtra congress huge lost
काँग्रेसवर लाल शेरा!

लोकसभेप्रमाणे मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळतील या आशेवर काँग्रेस नेते होते.. परंतु यंदा मुस्लीमबहुल मतदारसंघांत मुस्लीम मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले.

Maharashtra Assembly Elections Congress vs BJP Seat Wise Analysis
Congress vs BJP Seats : काँग्रेस विरुद्ध भाजपाच्या थेट लढतीत कुठे कोण विजयी? कोण पराभूत? वाचा सविस्तर यादी

भाजपाचे किती उमेदवार विजयी झाले आणि काँग्रेसचे किती उमेदवार विजयी झाले? वाचा यादी

Maharashtra Vidhan Sabha Election
Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभेत १० मोठ्या नेत्यांचा पराभव; काँग्रेस, भाजपा, प्रहारसह राष्ट्रवादीतील दिग्गजांचा पराभवात समावेश

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्यामुळे दिग्गजांना धक्का बसला आहे.

Ajit Pawar News
Assembly Election Result : सहा महिन्यांत काँग्रेसच्या मतांमध्ये सहा टक्क्यांची घट; अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मात्र दमदार कामगिरी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

संबंधित बातम्या