Associate Sponsors
SBI

काँग्रेस News

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (INC) २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राज्याच्या काळात झाली होती. एलेन ऑक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापना केली होती. काँग्रेसचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळात या पक्षाचे नेतृत्व मवाळ गटाकडे होते. पुढे १९०६ ते १९१९ पर्यंत तिचे नेतृत्व जहाल गटाकडे होते. त्यानंतर १९२० ते १९४७ या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे (Congress) नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले.


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठे योगदान आहे. या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतर देशाच्या राजकारणातही मोठी भूमिका बजावली आहे. काँग्रेसला मानणारा मोठा जनसमूह या देशात आहे. जवाहरलाल नेहरू. इंदिरा गांधी. राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री, मनमोहन सिंह या काँग्रेस नेत्यांनी भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे. तर डॉ. राजेंद्र प्रसाद, फारुखउद्दीन अहमद, रामास्वामी वेंकटरमण, शंकर दयाल शर्मा, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी या काँग्रेस नेत्यांनी भारताचे राष्ट्रपतीपद भूषवले आहे.

सध्या मल्लिकार्जुन खरगे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आहे. २०२२ पासून ते काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. त्यांच्या अगोदर सोनिया गांधी या पक्षाध्यक्ष म्हणून पक्षाची सूत्रे हाताळत होत्या.


२०१४ मध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. भाजपा प्रणित लोकशाही आघाडीने २०१४ साली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार पराभव केला. काँग्रेस प्रणित सयुक्त पुरोगामी आघाडीचे केवळ ५९ सदस्य निवडून आले होते. यात एकट्या काँग्रेस पक्षाला केवळ ४४ जागांवर विजय मिळाला. तर, भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३३६ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. २०१९ मध्येही काँग्रेसला शंभरचा आकडा गाठता आलेला नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीला केवळ ९१ जागांवरच विजय मिळवता आला. यात काँग्रेसचा वाटा ५२ इतका होता. पक्षात प्रभावी नेतृत्वाचा अभाव, अकार्यक्षमता आणि नेत्यांची गळती ही कारणे पराभवाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. मात्र २०२४ मध्ये काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नेतृत्वात लोकसभा निवडणूक लढवली. यात २०१९ आणि २०१४ मध्ये मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा जिंकण्यात तिला यश आले.


२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. यात काँग्रेसचा वाटा ९९ इतका आहे. इंडिया आघाडीला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नाही. भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली. परंतु, काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीच्या माध्यमातून संसदेत विरोधी बाकांवरील सदस्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा, न्याय यात्रा आणि भाजपविरोधातील पक्षांची मोट बांधण्यात काँग्रेसला आलेले यश हे सर्व या विजयाचे परिपाक असल्याचे मानले जाते.


 


Read More
Ahilyanagar Congress president resigns from party membership
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा पक्ष सदस्यत्वचा राजीनामा; ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता

आपण लवकरच पुढील राजकीय दिशा स्पष्ट करू, असे किरण काळे यांनी समाजमाध्यमात प्रसिद्ध केले आहे. असे असले तरी ते शिवसेनेच्या…

India alliance
“इंडिया आघाडी अबाधित, पुढच्या लोकसभा निवडणुकीत…”, दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेस नेत्याचं विधान चर्चेत

इंडिया आघाडीची स्थापना प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रत्येक पक्षाला राज्यस्तरीय निवडणुकीत स्वतःचे निर्णय घेण्याची परवानगी देण्यात आली…

Sanjay Raut On Congress Arvind Kejriwal
Sanjay Raut : “अरविंद केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…”, संजय राऊतांचं मोठं विधान

अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली होती. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी मोठं विधान केलं…

BJP winning streak continues after Lok Sabha elections while Congress defeats continues in election
लोकसभेनंतर भाजपची विजयी घौडदौड तर काँग्रेसच्या पराभवाची मालिका सुरू 

लोकसभा निवडणुकीत भाजपला साध्या बहुमतापासून रोखण्यात विरोधक यशस्वी झाले असले तरी त्यानंतर गेल्या आठ महिन्यांत झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत…

PM Narendra Modi Slams Congress
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचा गंभीर आरोप, “काँग्रेस पक्ष शहरी नक्षलवादाला खतपाणी घालून तोच अजेंडा…”

काँग्रेसचा अजेंडा शहरी नक्षलवादाला खतपाणी घालणारा, आप पक्षाचंही दिल्लीत तेच धोरण होतं असाही आरोप नरेंद्र मोदींनी केला आहे.

Delhi Election Results 2025 Vote Margin News
Delhi Election Results 2025 Vote Margin: ‘आप’साठी दिल्लीत ‘तेराचा फेरा’, काँग्रेसमुळे ‘या’ १३ जागांवर झाला पक्षाचा पराभव!

How AAP-Congress Feud Split Opposition Votes: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४८ जागांवर विजय मिळवत २७ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.

Chandrashekar Bawankule statement in Pimpri after Delhi Assembly elections
“केजरीवाल, काँग्रेसला दिल्लीच्या जनतेने धु-धु धुतले”, दिल्लीच्या तख्तावर भाजपचा मुख्यमंत्री- चंद्रशेखर बावनकुळे

अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसला दिल्लीच्या जनतेने धु- धु धुतले. अशी प्रतिक्रिया भाजप च्या विजयानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

अरविंद केजरीवालांना पराभूत करणारे 'जायंट किलर' पर्वेश वर्मा कोण आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Who is Parvesh Varma : अरविंद केजरीवालांना पराभूत करणारे ‘जायंट किलर’ पर्वेश वर्मा कोण आहेत? प्रीमियम स्टोरी

Delhi Election Result 2025 : नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे पर्वेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला…

Muslim-dominated constituencies in Delhi lean towards AAP in the 2025 elections, leaving Congress behind.
Delhi Election 2025 : दिल्लीतील मुस्लिमबहुल जागा ‘आप’कडे जाणार, सात पैकी सहा जागांवर आघाडी

Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने गेल्या तीन टर्मपासून सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला…

ताज्या बातम्या