सीपीआय Videos

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (सीपीआय (एम)) हा एक राजकीय पक्ष आहे. १९६४ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विभाजन झाल्यानंतर या पक्षाची स्थापना झाली होती. पश्चिम बंगालमध्ये या पक्षाच्या नेतृत्वातील डाव्या आघाडीने ३४ वर्षे सत्ता गाजवली होती. ही जगात सर्वाधिक काळ चालणारी लोकशाही पद्धतीने निवडून आलेली कम्युनिस्ट नेतृत्त्वातील सरकार होती. सध्या सीपीआय (एम) ही दोन राज्यांमधील सत्तारुढ युतींचा भाग आहे. केरळमध्ये डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि तमिळनाडूमध्ये सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स.


सीताराम येचुरी हे सीपीआय (एम) पक्षाचे सरचिटणीस आहेत. सध्या लोकसभेमध्ये या पक्षाचे केवळ ४ सदस्य आहेत. तर राज्यसभेमध्ये ५ सदस्य आहेत. देशातील विविध विधानसभांमध्ये या पक्षाचे ७८ सदस्य आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या पक्षाच्या केवळ ९ उमेदवारांना विजय मिळाला होता तर या पक्षाला समर्थन देणारे दोन अपक्ष निवडून आले होते. या निवडणुकीत सीपीआय (एम) पक्षाचा देशस्तरावरील मतांचा वाटा देखील घसरला होता. २००९ मध्ये तो ५.३३ टक्के होता जो २०१४ मध्ये ३.२४ टक्के इतका कमी झाला.


२०१९ च्या निवडणुकीत सीपीआय (एम) पक्षाने देशपातळीवर ६९ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना केवळ ३ जागाच जिंकता आल्या. यातील एक जागा केरळमध्ये तर दोन जागा तमिळनाडूमध्ये जिंकल्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही सीपीआय (एम) पक्षाला काही चमकदार कामगिरी करता आली नाही. पक्षाने देशपातळीवर ५२ जागा लढवल्या, मात्र केवळ चारच जागांवर विजय मिळाला. यात एक जागा केरळ, एक राजस्थान आणि दोन तमिळनाडू येथील आहे. २०२४ च्या निवडणुकांमध्येदेखील सीपीआय (एम) पक्षाला संसदेत आपली संख्या वाढवण्यात अपयश आल्याचे दिसून येते. २००९ पासून सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या पक्षाला उतरती कळा लागली आहे. त्याचबरोबर २०१४ (३.२४ %), २०१९ (१.७५ %) आणि २०२४ (१.७६ %) च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या पक्षाचा मतांचा टक्का घसरला आहे.


Read More

ताज्या बातम्या