चेन्नई सुपर किंग्स Videos

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी संघांपैकी एक आहे. एम.ए. चिदम्बरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. या संघाची मालकी चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेड या संस्थेकडे आहे. हा संघ तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई शहरावर आधारलेला आहे. २००८ मध्ये संघाच्या व्यवस्थापकांनी महेंद्र सिंह धोनीवर सर्वाधिक बोली लावत त्याला संघात घेतले. तेव्हा टी-२० विश्वचषक जिंकल्याने धोनीची मोठी क्रेझ होती. सुरुवातीपासून त्याच्याकडे कर्णधारपद आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली या संघाने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ या चार वर्षांमध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. तसेच सीएसकेने दोनदा चॅम्पिअन्स ट्रॉफीचे विजेतेपद राखले आहे. बेकायदेशीर पद्धतीने सट्टा लावल्याचे प्रकरण व अन्य काही कारणांकरुन २०१६-१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी संघावर बंदी घालण्यात आली होती. २०१८ मध्ये सीएसकेने पुन्हा कमबॅक केले. धोनी व्यतिरिक्त सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांनी काही सामन्यांसाठी संघाचे नेतृत्त्व केले आहे.


महेद्र सिंह धोनीचे (MS Dhoni) हे शेवटचा आयपीएल हंगाम आहे असे म्हटले जात आहे. यामुळे आपल्या लाडक्या कर्णधाराला शेवटच्या सामन्यांमध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. धोनीनंतर ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद दिले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या हंगामाच्या पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई आणि गुजरात हे संघ एकमेकांसमोर असणार आहेत.


Read More

ताज्या बातम्या