चक्रीवादळ News

लोकसत्ताच्या या सदरामध्ये तुम्हाला चक्रीवादळासंबधीत (Cyclone) बातम्या वाचता येऊ शकतात. चक्रीवादळ हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलाकार फिरणाऱ्या हवेमुळे तयार होते. या कमी दाबाच्या केंद्राला चक्रीवादळाचा डोळा असे म्हणतात या डोळ्याभोवतीग हवा गोल गोल फिरुन विध्वंसक वादळ निर्माण करते. हवा उत्तर गोलार्धात घड्याळ्या उलट दिशेने आणि दक्षिण गोलार्धात घड्याच्या दिशीने फिरून चक्रीवादळ निर्माण करते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सॉयक्लॉन (Cyclone) असेही म्हणतात. वेस्ट इंडिज आणि अलांटिकमध्ये तयार होणाऱ्या चक्रीवादळाला हरिकेन (Hurricane) असे म्हणतात तर पॅसिफिक महासागर व चीनी समुद्रातील चक्रीवादळाला टायफून (Typhoon)असे म्हणतात.


आस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील वादळाला विली-विली (Willy-Willy) या नावाने ओळखले जाते सध्या चक्रीवादळाला नाव देण्याची नवीन पद्धत आहे. हवामानतज्ज्ञ आणि त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद साधण्यास सोपे जावे म्हणून चक्रीवादळाचे नामकरण करतात. गेल्या काही वर्षात आलेल्या चक्रीवादळांचे बिपरजॉय चक्रीवादळ, तेज चक्रीवादळ, ‘मोचा’ चक्रीवादळ, ‘मंदौस’ चक्रीवादळ, “हामुन” चक्रीवादळ असे नामकरण करण्यात आले आहेत. हवामान खाते आणि हवामान तज्ज्ञ चक्रीवादळाबाबत अंदाज व्यक्त करतात.


कोणते चक्रीवादळ कोणत्या महासागरात आले आणि कोणत्या किनारपट्टीवर धडकू शकते, चक्रीवादाळामुळे कोणत्या ठिकाणचे नुकसान झाले अशा विविध प्रकारच्या बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.


Read More
Flood situation in Gujarat
गुजरात, राजस्थानमध्ये पूरस्थिती

‘बिपरजॉय’ वादळ क्षीण होऊन त्याचे कमी दाबक्षेत्रात रुपांतर झाल्यानंतर गेल्या २४ तासांत उत्तर गुजरात आणि राजस्थानला मुसळधार पावसाने झोडपले.

monsoon
अन्वयार्थ: वादळी संकटावर मात

बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातला दिलेल्या दणक्यातून सावरत असतानाच, या वादळामुळे सर्वात कमी मनुष्यहानी झाल्याचे श्रेय प्रशासनाच्या सुरक्षा व बचाव यंत्रणेच्या नियोजनाला…

rain monsoon
पाऊस थबकलेलाच, चक्रीवादळामुळे मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला

बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती मंदावली असून रत्नागिरीच्या पुढे त्यांची फारशी प्रगती झालेली नाही.

strom
चक्रीवादळे वाढताहेत, ती का?

अरबी समुद्रातील चक्रीवादळांच्या संख्येत गेल्या दोन दशकांत ५२ टक्के वाढ झाली आहे, तर अतितीव्र वादळांची संख्या दुपटीने वाढली आहे.

gujrat storm
गुजरातमधील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात, नुकसानग्रस्त भागांतील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ आता क्षीण होत चालले आहे. त्यानंतर याचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात शनिवारी दैनंदिन जनजीवन पूर्वपदावर येण्यास…

Uran Mumbai water service restored
उरण – मुंबई जलसेवा पूर्ववत, चक्रीवादळामुळे ९ जूनपासून होती बंद

उरण (मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का) दरम्यानची जलसेवा शनिवारपासून पूर्ववत करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना नऊ दिवसांनी दिलासा…

monsoon, State, Konkan, progress, biporjoy cyclone, Vidarbha Heat wave
मोसमी वाऱ्यांची वाटचाल खोळंबली; १६ जूनपासून मोसमी वारे तळ कोकणातच

अरबी समुद्रातील बाष्पयुक्त ढग चक्रीवादळाकडे खेचले गेल्यामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरही पावसाचा अपेक्षित जोर दिसून येत नाही. त्याचाच परिणाम राज्यातील मोसमी…

Cyclone Biparjoy Gujarat Updates
Biparjoy Cyclone: शेळ्यांना वाचवायला गेले नी वडील व मुलगा दोघांनी प्राण गमावले

Cyclone Biparjoy : गुरुवारी सायंकाळी बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकले. मात्र, सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिहोर शहराजवळील भंडार गावात पाण्याचा प्रवाह…

Cyclone Biparjoy Gujarat Updates
Biparjoy Cyclone : चक्रीवादळाच्या तडाख्याने गुजरातमध्ये वाताहात; विजेचे खांब, वृक्ष कोसळल्याने मोठी वित्तहानी, जीवितहानी किती?

Cyclone Biparjoy : ११५-१२५ किमी प्रतितास वाऱ्याच्या वेगाने चक्रीवादळाने गुजरातमध्ये प्रवेश केला. यामुळे वृक्ष कोलमडून पडली, विजेचे खांब कोसळले. परिणामी…