चक्रीवादळ Videos

लोकसत्ताच्या या सदरामध्ये तुम्हाला चक्रीवादळासंबधीत (Cyclone) बातम्या वाचता येऊ शकतात. चक्रीवादळ हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलाकार फिरणाऱ्या हवेमुळे तयार होते. या कमी दाबाच्या केंद्राला चक्रीवादळाचा डोळा असे म्हणतात या डोळ्याभोवतीग हवा गोल गोल फिरुन विध्वंसक वादळ निर्माण करते. हवा उत्तर गोलार्धात घड्याळ्या उलट दिशेने आणि दक्षिण गोलार्धात घड्याच्या दिशीने फिरून चक्रीवादळ निर्माण करते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सॉयक्लॉन (Cyclone) असेही म्हणतात. वेस्ट इंडिज आणि अलांटिकमध्ये तयार होणाऱ्या चक्रीवादळाला हरिकेन (Hurricane) असे म्हणतात तर पॅसिफिक महासागर व चीनी समुद्रातील चक्रीवादळाला टायफून (Typhoon)असे म्हणतात.


आस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील वादळाला विली-विली (Willy-Willy) या नावाने ओळखले जाते सध्या चक्रीवादळाला नाव देण्याची नवीन पद्धत आहे. हवामानतज्ज्ञ आणि त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद साधण्यास सोपे जावे म्हणून चक्रीवादळाचे नामकरण करतात. गेल्या काही वर्षात आलेल्या चक्रीवादळांचे बिपरजॉय चक्रीवादळ, तेज चक्रीवादळ, ‘मोचा’ चक्रीवादळ, ‘मंदौस’ चक्रीवादळ, “हामुन” चक्रीवादळ असे नामकरण करण्यात आले आहेत. हवामान खाते आणि हवामान तज्ज्ञ चक्रीवादळाबाबत अंदाज व्यक्त करतात.


कोणते चक्रीवादळ कोणत्या महासागरात आले आणि कोणत्या किनारपट्टीवर धडकू शकते, चक्रीवादाळामुळे कोणत्या ठिकाणचे नुकसान झाले अशा विविध प्रकारच्या बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.


Read More