डीके शिवकुमार

डीके शिवकुमार (D.K Shivkumar) हे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसचे फायटर नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. मागच्या काही काळात त्यांच्यावर ईडी चौकशीचा ससेमिरा लागला होता, तरीही त्यांनी काँग्रेसची साथ न सोडता मोठ्या हिमतीने या संकटाचा सामना केला. त्यांचा जन्म १५ मे १९६२ रोजी म्हैसूर म्हणजे सध्याचे कर्नाटक राज्यातील कनकापुरामध्ये झाला. एचडी देवेगौडा यांच्यानंतर वोक्कालिग या प्रभावशाली समाजाचे नेते म्हणून शिवकुमार यांच्याकडे पाहिले जाते. कर्नाटकमध्ये लिंगायत आणि वोक्कलिग हे दोन मोठे समुदाय आहेत.

डीके शिवकुमार यांनी १९८९ मध्ये सथानूरमधून एचडी देवेगौडा यांना पराभूत करत आपल्या राजकीय कारकिर्दला सुरुवात केली. ७ वेळा आमदार राहिलेले डीके शिवकुमार यांनी कर्नाटकात मंत्रिपद भूषवलेले आहे. डिके कुमार यांना कर्नाटकच्या राजकारणातला चाणक्य मानले जाते आणि कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचकही म्हटले जाते. जेव्हा जेव्हा कर्नाटक काँग्रेस संकटात सापडली, तेव्हा तेव्हा डीके शिवकुमार यांनी पक्षाला अडचणीतून बाहेर काढले. दुसरीकडे त्यांना आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक आहेत. याशिवाय देशातील सर्वात श्रीमंत राजकारणांपैकी ते एक आहेत. नुकत्याच कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी त्यांनी आपली १,४१३.७८ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. २०१३ च्या निवडणुकीपेक्षा ५९० कोटी रुपये जास्त होती.


डीके शिवकुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. २०१९ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने शिवकुमार यांना मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. याशिवाय नॅशल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणातही शिवकुमार आणि त्यांचा खासदार भाऊ डीके सुरेश यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे
Read More
Rajya Sabha adjourned
Muslim reservation : मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ, जे. पी. नड्डा आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात शाब्दिक चकमक

राज्यसभेत मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गदारोळ, काय काय घडलं जाणून घ्या.

siddaramaiah dk shivakumar (1)
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारकडून कार्यकर्त्यांच्या वेतनासाठी जनतेच्या पैशांचा वापर? ‘जीएसआयए’वरून विरोधकांनी सिद्धरामय्यांना घेरलं?

Karnataka Congress Government GSIA : कर्नाटक सरकारने एक वर्षापूर्वी सुरू केलेल्या गॅरंटी स्कीम इम्प्लिमेंटेश अथॉरिटीज (GSIA) अंतर्गत काँग्रेस कार्यकर्त्यांची योजनांवर…

Devendra Fadnavis
“विकासासाठी फडणवीस काय करतात ते पाहा”, इन्फोसिसच्या माजी अधिकाऱ्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला

Maharashtra Developement: मोहनदास पै यांनी कर्नाटकच्या आर्थिक दृष्टिकोनाची तुलना महाराष्ट्राच्या आक्रमक विकास धोरणांशी केली, यावेळी त्यांनी विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Tharoor and Shivakumar's statements put Kerala and Karnataka in the spotlight, creating a boost for BJP and a setback for Congress.
थरूर, शिवकुमार यांच्या विधानांमुळे केरळ आणि कर्नाटक चर्चेत, भाजपाचं मनोरंजन तर काँग्रेसचं नुकसान!

South India: भाजपा गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिणेकडील राज्यात प्रवेश करण्याचे प्रयत्न करत आहे. परंतु आतापर्यंत या राज्यांनी भाजपाला विरोधच केला…

karnataka ramanagara district name
Karnataka District Ramanagar: ‘रामनगर’ नव्हे, ‘बेंगलोर साऊथ’; कर्नाटक कॅबिनेटचं अखेर शिक्कामोर्तब, नावबदलाचं कारण सांगताना उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले…

Karnataka District Name Change: कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्याचं नाव बदलून आता बंगळुरू साऊथ करण्यात आलं आहे.

rahul gandhi prime minister of india dk shivakumar meets chandrababu naidu 2024 lok sabha elections result
राहुल गांधी होणार पंतप्रधान; डीके शिवकुमार यांनी घेतली चंद्राबाबू नायडूंची भेट? व्हिडीओच्या तपासात काय कळलं?

डी. के. शिवकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची भेट झाली का? आणि त्यांच्या भेटीदरम्यान राहुल गांधी हे पंतप्रधान होण्याच्या दृष्टीने कसलीही…

Karnataka chief minister Siddaramaiah and his deputy DK Shivakumar
काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी ‘काळी जादू’; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा आरोप

कर्नाटकमधील काँग्रेसचे सरकार उलथवून लावण्यासाठी केरळमधील राज राजेश्वरी मंदिराजवळ मांत्रिकाकडून काळी जादू केली जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी…

DK Shivakumar slapped Congress worker
VIDEO : छोटीशी चूक अन् डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली

कर्नाटक भाजपाने शिवकुमार यांनी काँग्रेस कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”

कर्नाटकच्या हुबळीमधील महाविद्यालयात एमसीएचे शिक्षण घेणाऱ्या नेहा हिरेमठ या विद्यार्थीनीची त्याच महाविद्यालयातील फयाज नामक विद्यार्थ्याने निर्घृण हत्या केली. यानंतर अखिल…

dk shivakumar and dk suresh
‘दक्षिण भारत वेगळा देश जाहीर करा’, काँग्रेस खासदार डीके सुरेश यांची अजब मागणी

Budget 2024 : काँग्रेसचे खासदार आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू डीके सुरेश यांनी एक अजब मागणी केली आहे.…

DK Shivakumar
“सिद्धरामय्यांच्या नावात ‘राम’ अन् माझ्या ‘शिव’, त्यामुळे…”, डी.के शिवकुमार यांचं भाजपाला प्रत्युत्तर

केंद्र सरकारनं अर्ध्या दिवसाची तर अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. कर्नाटकतही सुट्टी जाहीर करण्याची मागणी भाजपाकडून केली जातीय.

mallikarjun kharge and d k shivakumar
जातीआधारित सर्वेक्षणावरून राज्यसभेत खडाजंगी; खरगेंच्या टीकेनंतर शिवकुमार यांचा सूर नरमला!

कर्नाटकच्या जातीआधारित सर्वेक्षणाचे नेमके काय झाले, हे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगायला हवे, असे सुशील मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या