डीके शिवकुमार Photos

डीके शिवकुमार (D.K Shivkumar) हे कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. काँग्रेसचे फायटर नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. मागच्या काही काळात त्यांच्यावर ईडी चौकशीचा ससेमिरा लागला होता, तरीही त्यांनी काँग्रेसची साथ न सोडता मोठ्या हिमतीने या संकटाचा सामना केला. त्यांचा जन्म १५ मे १९६२ रोजी म्हैसूर म्हणजे सध्याचे कर्नाटक राज्यातील कनकापुरामध्ये झाला. एचडी देवेगौडा यांच्यानंतर वोक्कालिग या प्रभावशाली समाजाचे नेते म्हणून शिवकुमार यांच्याकडे पाहिले जाते. कर्नाटकमध्ये लिंगायत आणि वोक्कलिग हे दोन मोठे समुदाय आहेत.

डीके शिवकुमार यांनी १९८९ मध्ये सथानूरमधून एचडी देवेगौडा यांना पराभूत करत आपल्या राजकीय कारकिर्दला सुरुवात केली. ७ वेळा आमदार राहिलेले डीके शिवकुमार यांनी कर्नाटकात मंत्रिपद भूषवलेले आहे. डिके कुमार यांना कर्नाटकच्या राजकारणातला चाणक्य मानले जाते आणि कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचकही म्हटले जाते. जेव्हा जेव्हा कर्नाटक काँग्रेस संकटात सापडली, तेव्हा तेव्हा डीके शिवकुमार यांनी पक्षाला अडचणीतून बाहेर काढले. दुसरीकडे त्यांना आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक आहेत. याशिवाय देशातील सर्वात श्रीमंत राजकारणांपैकी ते एक आहेत. नुकत्याच कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी त्यांनी आपली १,४१३.७८ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. २०१३ च्या निवडणुकीपेक्षा ५९० कोटी रुपये जास्त होती.


डीके शिवकुमार यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. २०१९ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने शिवकुमार यांना मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीच्या आरोपाखाली अटक केली होती. याशिवाय नॅशल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणातही शिवकुमार आणि त्यांचा खासदार भाऊ डीके सुरेश यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे
Read More
Karnataka memes Congress Win _ 1
9 Photos
Photos: “कितना मजा आ रहा है…” काँग्रेसच्या बाजूने निकाल झुकताच इंटरनेटवर मिम्सचा पाऊस

Karnataka Election Results 2023 : कर्नाटकमधील २२४ विधानसभा मतदारसंघाच्या मतदानाचे निकाल आज येत आहेत. काँग्रेसने बहुमतासाठी लागणाऱ्या आकड्याच्या पुढे जाऊन…