१९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे (Babasaheb Thackeray) यांनी त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसह शिवसेना या नव्या पक्षाची स्थापना केली. खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी हे नाव सुचवले होते. मुंबईमध्ये मराठी माणसाची होणारी गळचेपी रोखण्यासाठी बाळासाहेबांनी एक चळवळ सुरु केली. पुढे हीच चळवळ शिवसेना म्हणून नावारुपास आली.
पक्षनिर्मितीनंतर एखादी जाहीर सभा घेण्याचा मानस शिवसेनाप्रमुखांचा होता. तेव्हा दसऱ्याचा मुहूर्त साधत दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ) येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी पहिला दसरा मेळावा (Dasara Melava) भरला. त्यावर्षापासून दरवर्षी शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन केले गेले. या निमित्ताने बाळासाहेब खास भाषण करत. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी लोक महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून येत असतं. पक्ष स्थापनेपासून ते आत्तापर्यंत २००६ साली अतिपावसामुळे, २००९ व २०१४ मध्ये विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू असल्याने दसरा मेळावा रद्द करण्यात आला होता.
२०१२ मध्ये बाळासाहेब शेवटचे भाषण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात केले होते. करोना काळात दसरा मेळावा छोटेखानी स्वरुपात साजरा केला गेला. शिंदे गटाच्या बंडानंतर २०२२ मध्ये शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी तर बीकेसीमध्य़े एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते.Read More