दसरा मेळावा Videos

१९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे (Babasaheb Thackeray) यांनी त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांसह शिवसेना या नव्या पक्षाची स्थापना केली. खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी हे नाव सुचवले होते. मुंबईमध्ये मराठी माणसाची होणारी गळचेपी रोखण्यासाठी बाळासाहेबांनी एक चळवळ सुरु केली. पुढे हीच चळवळ शिवसेना म्हणून नावारुपास आली.

पक्षनिर्मितीनंतर एखादी जाहीर सभा घेण्याचा मानस शिवसेनाप्रमुखांचा होता. तेव्हा दसऱ्याचा मुहूर्त साधत दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ) येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी पहिला दसरा मेळावा (Dasara Melava) भरला. त्यावर्षापासून दरवर्षी शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन केले गेले. या निमित्ताने बाळासाहेब खास भाषण करत. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी लोक महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून येत असतं. पक्ष स्थापनेपासून ते आत्तापर्यंत २००६ साली अतिपावसामुळे, २००९ व २०१४ मध्ये विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू असल्याने दसरा मेळावा रद्द करण्यात आला होता.

२०१२ मध्ये बाळासाहेब शेवटचे भाषण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात केले होते. करोना काळात दसरा मेळावा छोटेखानी स्वरुपात साजरा केला गेला. शिंदे गटाच्या बंडानंतर २०२२ मध्ये शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी तर बीकेसीमध्य़े एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते.
Read More
CM Eknath Shinde criticized Mahavikasaghadi over maharashtra politics
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मविआवर हल्लाबोल; म्हणाले, “मला हलक्यात घेऊ नका…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून मविआवर टीका केली आहे. “माझी दाढी त्यांना खुपतेय. अरे होती दाढी म्हणून तुमची…

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Dasara melava in Mumbai Shivaji Park LIVE
Uddhav Thackeray Live: शिवाजी पार्कवर दसरा मेळावा; उद्धव ठाकरे LIVE

शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यातील भाषणार उद्धव ठाकरे कोण-कोणत्या विषयावर भाष्य करणार…

CM Eknath Shinde Shivsena Dasara melava Live
Eknath Shinde Live: दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे LIVE | Dasara Melava

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेला दसरा मेळावा हा मुंबईमधील आझाद मैदान येथे पार पडत आहे. या मेळाव्यातील भाषणात एकनाथ…

Manoj Jarange Patil Live: नारायण गडावर दसरा मेळावा; मनोज जरांगे LIVE
Manoj Jarange Patil Live: नारायण गडावर दसरा मेळावा; मनोज जरांगे LIVE

बीडमधील नारायणगड येथे मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. नारायणगड येथे होणाऱ्या या मेळाव्यात जरांगे मराठा आंदोलनाची पुढील…

Manoj Jarange Patil dashhara melava 2024 Live from Narayangad
Manoj Jarange Patil Live: नारायण गडावर दसरा मेळावा; मनोज जरांगे LIVE

बीडमधील नारायणगड येथे मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. नारायणगड येथे होणाऱ्या या मेळाव्यात जरांगे मराठा आंदोलनाची पुढील…

BJP Leader Pankaja Gopinath Munde Dasara melava Live In Beed
Pankaja Munde Live: भगवान भक्ती गडावर दसरा मेळावा; पंकजा मुंडे LIVE

पंकजा मुंडे यांनी बीडमधील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे.या मेळाव्याला धनंजय मुंडे हे देखील हजेरी लावणार आहेत,…

ताज्या बातम्या