दिल्ली कॅपिटल्स Videos

दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील एक संघ आहे. अरुण जेटली स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. सध्या या संघाची मालकी जीएमआर आणि जेएसडब्लू यांच्यामध्ये विभागलेली आहे. आयपीएलच्या सुरुवातीला दिल्ली शहरावरुन ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ या संघाची स्थापना करण्यात आली. तेव्हा वीरेंद्र सेहवागकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. आयपीएलमधील सर्वात अयशस्वी संघांमध्ये या दिल्लीच्या संघाचा समावेश होतो. या संघाने आयपीएलच्या प्रत्येक हंगामामध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. एकाही वर्षी त्यांना आयपीएलची ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यावर उपाय म्हणून व्यवस्थापकांद्वारे कर्णधार बदलणे, नव्या दमाच्या खेळाडूंना संघामध्ये समाविष्ट करणे अशा गोष्टी करण्यात आल्या. परंतु त्याचा फायदा संघाला झाला नाही.


पुढे २०२१ मध्ये ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’चे नाव बदलून ‘दिल्ली कॅपिटल्स’ असे ठेवण्यात आले. नावासह जर्सी, लोगो अशा गोष्टींमध्येही बदल करण्यात आले. ऋषभ पंत या युवा क्रिकेटपटूकडे संघाचे नेतृत्त्व दिले गेले. आयपीएल २०२१ मध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीच्या संघाने अनेक सामने जिंकले. ते गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रंमाकावर होते. पण त्यांना आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. २०२२ मध्ये त्यांंनी पुन्हा खराब कामगिरी केली. काही महिन्यांपूर्वी ऋषभ पंतचा अपघात झाला होता. तो यंदाच्या आयपीएलमध्ये सहभागी होणार नाही. त्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची धुरा डेव्हिड वॉर्नरकडे दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Read More