दिल्ली प्रदूषण News
जागतिक आरोग्य संघटना या संस्थेच्या १,६५० जागतिक शहरांच्या सर्वेक्षणानुसार आणि ऑगस्ट २०२२ मध्ये अमेरिका स्थित हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूटने केलेल्या सात हजार जागतिक शहरांच्या सर्वेक्षणानुसार, भारताचा राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील (Delhi City) हवेची गुणवत्ता जगातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये खूप वाईट आहे.
दिल्लीच्या आसपासच्या शहरांवर त्याचा परिणाम होत आहे. भारतामध्ये दरवर्षी वायू प्रदूषणामुळे सुमारे २ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीवरील प्रदूषणावर भाष्य करताना “दिल्लीची अवस्था नरकापेक्षा वाईट आहे” असे विधान तकेले होते. औद्योगिक प्रगतीमुळे येथे कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. यांच्यासह बांधकाम, लोकसंख्ये होणारी वाढ अशा कारणांमुळे दिल्लीमध्ये वायू प्रदूषण (Delhi Pollution)वाढत आहे. यासाठी सरकारने अनेक नियम देखील केले आहेत.
करोना काळामध्ये ही स्थिती काहीशी सुधारली होती, पण सर्वकाही सुरु झाल्यानंतर पुन्हा प्रदूषण वाढू लागले. सध्या दिल्लीचा एयर क्लालिटी इंडेक्स १६०-१७० यांमध्ये आहे.Read More