scorecardresearch

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Jul 1970
वय 54 Years
जन्म ठिकाण नागपूर
देवेंद्र फडणवीस यांचे चरित्र

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ५ डिसेंबर २०२४ ला मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि वयाच्या ४४ व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. तसेच डहलम स्कूल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते १९९८ मध्ये जर्मनीला गेले होते. २००६ मध्ये त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी लग्न केले आणि त्यांना
दिविजा नावाची एक मुलगी आहे.

Read More
देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक जीवन
वडील
गंगाधर फडणवीस
आई
सरीता फडणवीस
जोडीदार
अमृता फडणवीस
मुले
दिविजा फडणवीस
नेट वर्थ
₹8,71,21,376
व्यवसाय
मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस न्यूज

केंद्रातील भाजपा सरकारने जातीय जनगणनेबाबत निर्णय घेतल्यानंतर भुजबळ यांना दुर्लक्षित करणं महायुतीसाठी अवघड झालं होतं. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीमध्ये छगन भुजबळांचं महत्व का वाढलं?

Chhagan Bhujbal Mahayuti Cabinet : केंद्रातील भाजपा सरकारने जातीय जनगणनेबाबत निर्णय घेतल्यानंतर भुजबळ यांना दुर्लक्षित करणं महायुतीसाठी अवघड झालं होतं. कारण, या जनगणनेचा सर्वाधिक फायदा ओबीसींना होणार, अशा चर्चांनी जोर धरला होता.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. (PC : CMO Maharashtra/X)
‘माझे घर, माझा अधिकार’चा नारा देत राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर! मंत्रिमंडळ बैठकीत आठ मोठे निर्णय

Maharashtra New Housing Policy : नवीन गृहनिर्माण धोरणांतर्गत राज्यात ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.=

(संग्रहित छायाचित्र)
पुण्यात भाजपचा स्वबळाचा; राष्ट्रवादी, शिवसेनेचा ‘एकला चलो रे’चा नारा

महापालिका निवडणुकीत महायुती होणार की नाही, हे वरिष्ठांच्या मर्जीवर अवलंबून असले, तरी तिन्ही पक्ष स्वबळाच्यादृष्टीने तयारीला लागल्याने इच्छुकांमध्ये उत्साह संचारल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

(फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबार, पालकमंत्र्याचा जनसंवाद!

जनता दरबाराला होणारी गर्दी ही लोकांची कामे वेळेत होत नाही, याचा पुरावा आहे, ही बावकुळे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आपल्याच सरकारच्या अखत्यारित काम करणाऱ्या प्रशासनावर अविश्वास व्यक्त करणारी आहे.

डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार (image credit - @Dev_Fadnavis/twitter X)
डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक, महाराष्ट्र भूषण जयंत नारळीकर यांच्या निधनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले.

अंजली दमानियांचे भुजबळांच्या मंत्रीपदावर सवाल (फोटो - संग्रहीत छायाचित्र)
Anjali Damania Post: “वाह फडणवीस वाह, असा काय नाईलाज आहे की…”, छगन भुजबळांच्या शपथविधीवर अंजली दमानियांचा सवाल!

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या शपथविधीवरून अंजली दमानियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

चांगले काम करणाऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी!मुख्यमंत्री फडणवीस यांची समित्यांना ग्वाही (लोकसत्ता टीम)
चांगले काम करणाऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी!मुख्यमंत्री फडणवीस यांची समित्यांना ग्वाही

राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना स्थिरस्थावर झाल्यानंतर आता परदेश दौऱ्याचे वेध लागले आहेत. त्यानुसार विधिमंडळाच्या विविध समित्यांचे परराज्यात, परदेशात दौरे आयोजित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.

मुंबई महापालिका निवडणूक मित्रपक्ष स्वबळावर लढू शकतात, भाजपाचा नेमका इशारा काय?

२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ८२ जागांसह भाजपा ८४ जागा असलेल्या अविभाजित शिवसेनेपेक्षा पिछाडीवर होती. त्यावेळी दोन्ही मित्रपक्ष होते. तरी त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या. आता शिवसेना विभाजित असल्याने भाजपाला खात्री आहे की, मुंबई महापालिकेसह बहुसंख्य महापालिकांमध्ये घवघवीत यश मिळू शकते.

(संग्रहित छायाचित्र)
‘या’ समाजाचा मुख्यमंत्र्यांना खडा सवाल, “सरकार तर आले, आमचे काय?” फुंकला बिगुल…

विधानसभा निवडणुकीपूर्वी समाज नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आले की तुमच्या मागण्या मार्गी लावणार, अशी हमी दिली होती.

राहुल गांधींच्या वक्तव्यातून भारतीय सेनेवर अविश्वास - फडणवीस ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
राहुल गांधींच्या वक्तव्यातून भारतीय सेनेवर अविश्वास – फडणवीस

काँग्रेस जय हिंद यात्रा काढत असेल तर ठीक आहे. परंतु, आमची अपेक्षा एवढीच असेल ती राजकीय यात्रा होऊ नये. भारतीय सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका.

संबंधित बातम्या