देवेंद्र फडणवीस News

devendra fadnavis says sit to probe arson in beed during maratha quota stir

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्यातील आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रमुख नेते आहेत. त्यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि वयाच्या ४४ व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. तसेच डहलम स्कूल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते १९९८ मध्ये जर्मनीला गेले होते. २००६ मध्ये त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी लग्न केले आणि त्यांना एक मुलगी आहे.


फडणवीस यांनी आपली राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून (RSS) सुरू केली आणि १९९० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये सामील झाले. त्यांनी नागपूरच्या राम नगर प्रभागातून त्यांची पहिली महापालिका निवडणूक जिंकली आणि १९९२ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९७ मध्ये, ते नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर आणि भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर बनले. १९९९ पासून ते २००४ पर्यंत सलग तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.


२०१९ साली त्यांनी ‘पुन्हा येईन’ अशी घोषणा देत भाजपाचे १०५ आमदार निवडून आणले. पण शिवसेनेने निकालानंतर युती तोडल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर त्यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण बहुमत सिद्ध करण्यात अडचणी दिसत असल्यामुळे तीनच दिवसात त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे २०२२ साली शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना बाजूला करून शिवसेनेवरच हक्क सांगितला. एकनाथ शिंदेंबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन केले. तसेच २०२३ मध्ये राष्ट्रवादीतून अजित पवारांना वेगळे करण्यातही त्यांनी यश मिळविले. मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो, असे विधान त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान केले होते.


२०२४ च्या लोकसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. मात्र भाजपाला २०१९ मध्ये असलेल्या २३ जागा पुन्हा जिंकून आणण्यात अपयश आले. २८ जागा लढणाऱ्या भाजपाला केवळ ९ जागा मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदावरून मुक्त करण्याची विनंती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे केली. मात्र पक्षाने त्यांची मागणी फेटाळून लावत विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावरच विश्वास असल्याचे दाखवून दिले.


Read More
Bala Nandgaokar meet Devendra Fadnavis
Bala Nandgaokar : बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; म्हणाले, “त्यांनी मला पाठिंबा…” फ्रीमियम स्टोरी

उद्या मतमोजणी असून तत्पुर्वी बाळा नांदगावकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपाचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबद्दल…

Devendra Fadnavis, South-West constituency,
देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दक्षिण-पश्चिम’मध्ये मतदानात तीन टक्क्यांची वाढ

राज्यातील महत्त्वपूर्ण मतदारसंघापैकी एक असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात २०१९ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा तीन टक्क्यांची वाढ झालेली आहे.

Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच नाना पटोलेंच्या विधानाची मोठी चर्चा; म्हणाले, “मी आणि देवेंद्र फडणवीस…” प्रीमियम स्टोरी

Nana Patole On Devendra Fadnavis : निकालाच्या आधी मुंबईत मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. एकीकडे महायुतीच्या बैठकांचा धडाका सुरु आहे,…

dcm Devendra fadnavis ladki bahin yojana
Devendra Fadnavis: मतटक्का वाढण्यामागे ‘लाडकी बहीण’, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मत

वाढलेली मतदानाची टक्केवारी बघता राज्यात महायुती व मित्रपक्षाला त्याचा फायदा होईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

devendra Fadnavis said increased voter turnout in state will benefit from it
मुख्यमंत्रीपद, वाढलेली मतदान टक्केवारीवर, फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले वाढलेली मतदानाची टक्केवारी बघता राज्यात त्याचा महायुती आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होईल

Who Will Be The Next CM? This Exit Poll Prediction
Maharashtra Exit Poll 2024 : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे की अजित पवार? मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कुणाला? काय सांगतो ‘हा’ एक्झिट पोल?

Maharashtra Exit Poll 2024 : महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होईल याचा अंदाज पिपल्स पल्स या एक्झिट पोलने वर्तवला आहे.

Devendra Fadnavis On Maharashtra Vidhan Sabha Exit Poll
Devendra Fadnavis : एग्झिट पोलच्या अंदाजांवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जेव्हा मतदान…” फ्रीमियम स्टोरी

Maharashtra Vidhan Sabha Exit Poll Updates: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? कोणता पक्ष मोठा पक्ष ठरणार? हे सर्व आता निकालाच्या दिवशी…

Devendra Fadnavis on Anil Deshmukh
Devendra Fadnavis : “दगड मागून मारला, तर पुढे कसं लागलं? असा दगड फक्त रजनीकांतच्या…”, अनिल देशमुखांच्या हल्ल्यावर देवेंद्र फडणवीसांचे प्रश्न!

अनिल देशमुखांवरील हल्ल्याला गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिनेमाचं विशेषण दिलं आहे. दगड मागून लागला तर पुढे कशी जखम…

Devendra Fadnavis voted with his family confident that voting percentage increase this time
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मतदानाचा टक्का वाढेल, फडणवीसांना विश्वास, कुटुंबासोबत केले मतदान

देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला.मतदानाचा टक्का यावेळेला वाढेल, असे मला निश्चितपणे वाटतं.

Devendra Fadnavis Reaction on Anil Deshmukh Attack
Devendra Fadnavis : “अनिल देशमुख हे सलीम-जावेद प्रमाणे चित्रपटांच्या स्टोऱ्या..”, देवेंद्र फडणवीसांची हल्ला प्रकरणी प्रतिक्रिया

Devendra Fadnavis : अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी हल्ला झाला, या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या