देवेंद्र फडणवीस Photos

devendra fadnavis says sit to probe arson in beed during maratha quota stir

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ५ डिसेंबर २०२४ ला मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे १८वे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि वयाच्या ४४ व्या वर्षी ते राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी झाला. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. तसेच डहलम स्कूल ऑफ एज्युकेशनमधून बिझनेस मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते १९९८ मध्ये जर्मनीला गेले होते. २००६ मध्ये त्यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याशी लग्न केले आणि त्यांना

दिविजा नावाची एक मुलगी आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी आपली राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून (RSS) सुरू केली आणि १९९० च्या दशकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) मध्ये सामील झाले. त्यांनी नागपूरच्या राम नगर प्रभागातून त्यांची पहिली महापालिका निवडणूक जिंकली आणि १९९२ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी सर्वात तरुण नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९७ मध्ये, ते नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर आणि भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर बनले. १९९९ पासून ते २००४ पर्यंत सलग तीन वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.


२०१९ साली त्यांनी ‘पुन्हा येईन’ अशी घोषणा देत भाजपाचे १०५ आमदार निवडून आणले. पण शिवसेनेने निकालानंतर युती तोडल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर त्यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण बहुमत सिद्ध करण्यात अडचणी दिसत असल्यामुळे तीनच दिवसात त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे २०२२ साली शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना बाजूला करून शिवसेनेवरच हक्क सांगितला. एकनाथ शिंदेंबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन केले. तसेच २०२३ मध्ये राष्ट्रवादीतून अजित पवारांना वेगळे करण्यातही त्यांनी यश मिळविले. मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो, असे विधान त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान केले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे १३२ आमदार निवडून आणण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांनी साधली आहे. सलग तीनवेळा भाजपाचे १०० हून अधिक आमदार निवडून आणण्याचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस यांच्या नावे नोंदवला गेला आहे.


२०२४ च्या लोकसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. मात्र भाजपाला २०१९ मध्ये असलेल्या २३ जागा पुन्हा जिंकून आणण्यात अपयश आले. २८ जागा लढणाऱ्या भाजपाला केवळ ९ जागा मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदावरून मुक्त करण्याची विनंती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे केली. मात्र पक्षाने त्यांची मागणी फेटाळून लावत विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावरच विश्वास असल्याचे दाखवून दिले.


Read More
Rekha Gupta Takes Oath As Delhi chief minister Parvesh verma and these 5 MLAs also took the oath for cabinet minister
15 Photos
अरविंद केजरीवालांना पराभूत करणारे परवेश वर्मा मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या मंत्रिमंडळात, पार पडला शपथविधी सोहळा!

दिल्लीचे उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली.

Shiv Jayanti Celebration photos
13 Photos
छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५वी जयंती राज्यभरात उत्साहात साजरी, पाहा खास फोटो…

Shiv Jayanti 2025: ३९५ व्या जयंतीनिमित्त शिवभक्तांनी विविध देखावेही सादर तयार केल्याचं पाहायला मिळालं.

Devendra Fadnavis Raj Thackeray Meet
11 Photos
“किती दिवस लपून प्रेम करणार?”; विजय वडेट्टीवारांची फडणवीस-राज ठाकरे भेटीवर प्रतिक्रिया तर संजय राऊत म्हणाले…

Devendra Fadnavis Raj Thackeray Meet : देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीवर राजकीय वर्तुळातून अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत, कोण काय म्हणाले ते…

Chief Minister Devendra Fadnavis clarified What did Maharashtra get in the union Budget 2025
9 Photos
‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२५’मध्ये महाराष्ट्राला काय मिळालं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट…

Union Budget 2025 : अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यासाठी काय आहे, कोणत्या तरतुदी आहेत? याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली…

Devendra Fadnavis Switzerland Davos 2025
10 Photos
Photos: देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केले स्वित्झर्लंडच्या दावोसमधील फोटो

या दावोस दौर्‍यात महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागांत गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Amruta Fadnavis Mangalsutra Design Nagpur Rally
15 Photos
Photos: उपराजधानीत देवेंद्र फडणवीस यांचं जल्लोषात स्वागत; चर्चा मात्र अमृता फडणवीस यांच्या मंगळसूत्राच्या डिझाईनची

राज्याच्या सर्वोच्च पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रविवारी दुपारी १२ वाजता त्याचे नागपूर विमानतळावर आगमन झाले.

Maharashtra Cabinet Expansion These MLAs from the Mahayuti allies got the ministerial post for the first time
18 Photos
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीतील ‘या’ आमदारांच्या गळ्यात पहिल्यांदाच मंत्रिपदाची माळ

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता भाजपाच्या २० शिवसेनेच्या (शिंदे) १२ व राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)

chief minister Devendra fadanvis dcm Eknath shinde and ajit pawar pays tribute to dr Babasaheb Ambedkar on mahaparinirvan diwas at chaityabhoomi
11 Photos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

ताज्या बातम्या