देवाल्ड ब्रेविस Photos
देवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) हा दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील फलंदाज आहे. तो मुंबई इंडियन्स संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. उत्कृष्ट फटाकेबाजी करत असल्यामुळे त्याला ‘बेबी एबी’ (Baby AB) असे टोपणनाव पडले आहे. २०२१-२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेमधील सीएसए प्रांतीय टी-२० नॉक आउट स्पर्धेमध्ये अंडर-१९ गटाअंतर्गत पदार्पण केले. पुढे वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पाठवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघामध्ये देवाल्ड ब्रेविसची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये त्याने दोनदा शतकीय कामगिरी केली. शिवाय तीन अर्धशतकं देखील झळकावली. लीगमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याचा गौरव करण्यात आला.
फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावामध्ये त्यावर सर्वाधिक बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघामध्ये सामील केले. या हंगामामध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. एमआयच्या केपटाउन संघामध्ये त्याचा सहभाग आहे.
Read More