दिग्विजय सिंह हे भारतीय राजकारणी आहेत. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९४७ रोजी मध्यप्रदेशच्या इंदौरमध्ये झाला. दिग्विजय सिंह यांनी १९६९ मध्ये पालिका अध्यक्षाच्या रुपाने राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. १९७७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. तसेच ते १९८० मध्य प्रदेश सरकारमध्ये मंत्री झाले. १९८४ साली दिग्विजय सिंह यांनी लोकसभा निवडणूक लढवली. तसेच या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. पुढे १९८५ मध्ये मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही झाले. १९९३ साली ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. २००३ पर्यंत ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले. दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस पक्षातही विविध पदांवर काम केलं.