डोंबिवली

डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील मोठ्या शहरांपैकी एक आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा बहुतांश भाग डोबिवलीमध्ये येतो. मुंबई, ठाणे, नवीमुंबई यांच्यानंतर प्रमुख शहरांमध्ये डोंबिवलीचा समावेश होतो. हे शहर पश्चिमेकडून चोळेगांव, पूर्वेकडून आयरेगाव, दक्षिणेकडून पाथर्ली आणि उत्तरेकडून ठाकुर्ली या गावांनी वेढलेले आहे. डोंबिवलीचा इतिहास फार जुना आहे. इ.स.१०७५ सालच्या राजा हरपाल देव याच्या शिलालेखात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. जेव्हा पोर्तुगीज डोंबिवलीमध्ये आले, तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले तळ उभारले होते. इ.स.१७३० मध्ये पेशवेकाळात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. १९ व्या शतकात डोंबिवलीतील शेतकरी भात पिकवत असत आणि कल्याण ते मुंबई येथे त्याची विक्री करत असत. या ठिकाणी राहणारे मूळ निवासी ‘डोंब’ लोक होते आणि त्यांच्यावरुन या ठिकाणाला डोबिवली असे नाव पडले असे मानले जाते.


सुरुवातीला डोंबिवलीला शहराचे स्वरुप मिळाल्यावर तेथे नगरपालिका तयार करण्यात आली. पुढे ऑक्टोबर १९८३ मध्ये कल्याण आणि डोबिंवली दोन्ही शहरांची मिळून एकच महानगरपालिका स्थापन केली गेली. मुंबईतून मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोक डोंबिवलीमध्ये वास्तव्याला गेले. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो. डोंबिवलीची ओळख असलेल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला १९९९ मध्ये सुरुवात झाली.


डोंबिवली शहराच्या लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळते. लोकसंख्येचा विचार करायला गेल्यास डोंबिवलीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२,४६,३८१ इतकी आहे. हे शहर मुंबई लोकलसाठीही महत्त्वपूर्ण आहे. मुंबईतील बहुतांश नोकरदार वर्ग हा या शहरात वास्तव्याला असल्याने एका प्रकारे हे शहर आर्थिक राजधानी पाठबळ पुरवते असे म्हणता येईल.


Read More
kalyan mumbra bypass traffic jam road accident at Shilphata - Mahape road
पाच तासानंतर वाहन चालकांनी घेतला कोंडीतून मोकळा श्वास, शिळफाटा मार्गावरील अपघातामुळे झाली होती कोंडी

अवघ्या १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालाकांना २५ ते ३० मिनीटे लागत होते. सुमारे पाच तासानंतर म्हणजेच, दुपारी १…

dipesh mhatre news in marathi news
कल्याण डोंबिवलीत विकास आराखडा डावलून सिमेंट रस्त्यांची कामे, जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांची आयुक्तांकडे चौकशीची मागणी

शहरातील रस्ते हे विकास आराखड्यातील १५ मीटर, १८ मीटर, २० मीटर रस्त्याप्रमाणे होणे आवश्यक आहे. कल्याण, डोंबिवली शहरे वाढत आहेत.

hare krishna dombivli loksatta news
डोंबिवली पलावा सिटी परिसरात हरे कृष्ण मंदिराची उभारणी; मंदिर परिसर सामाजिक, अध्यात्मिक, श्रध्दा केंद्र बनविण्याचा ट्रस्टचा निर्धार

हरे कृष्ण मंदिर मुंबई, नवी मुंबईत आहेत. ठाणे ते कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरात अशाप्रकारचे मंदिर नसल्याने भक्तांना नवी मुंबई, मुंबईत…

Dombivli local MLA Ravindra Chavan has demanded a memorial to preserve the memories of Three innocent citizens of dombivli killed in terror attack
डोंबिवलीत भागशाळा मैदानात दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांचे स्मृतिस्थळ?

दहशतवादी हल्ल्यातील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांच्या स्मृती जपण्यासाठी भागशाळा मैदानात एक स्मृतिस्थळ उभारण्यात यावे, अशी मागणी…

Rare birds flock to the shores of Dombivli Bay
डोंबिवली खाडी किनारी दुर्मिळ पक्ष्यांचा संचार; पर्यावरणप्रेमींकडून खाडी किनारच्या जैवविविधता संवर्धनाचे आवाहन

या पट्टयात अनेक भागात खाडी किनारी कांदळवनाचे जंगल काही जागरूक पर्यावरणप्रेमी नागरिकांमुळे शिल्लक आहे.

valuable items of the Dombivli victims from the Pahalgam terrorist attack were returned to their families
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील डोंबिवलीतील मृतांजवळील किंमती ऐवज कुटुंबीयांना परत

पहलगाम पोलीस आणि लष्कराने हे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याजवळ पडलेला किमती ऐवज पहलगाम पोलिसांनी ताब्यात घेतला होता

Dombivli, two youths who robbed pedestrians at knifepoint on Tilak Road have been arrested
डोंबिवलीत टिळक रोडवर पादचाऱ्यांना चाकुचा धाक दाखवून लुटणारे दोन तरूण अटकेत

तेजस राजु देवरूखकर (२०, रा. ओशियन प्राईड, सोनारपाडा), सुजित विजय थोरात (२०, आरो पार्क, सोनारपाडा) अशी अटक करण्यात आलेल्या लुटारू…

Dombivli Pendharkar College Prof. Ram Kapse Cricket Academy inaugurated by former IAS officer Lakshmikant Deshmukh
डोंबिवलीत पेंढरकर महाविद्यालयात प्रा. राम कापसे क्रिकेट अकॅडेमी, माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा विषयक शिक्षक उपस्थित होते.

In Thakurwadi area of Dombivli West, land mafias have built an illegal seven floor building on government land
डोंबिवलीत ठाकुरवाडीत सरकारी जमिनीवर बेकायदा इमारतीची उभारणी, तोडलेली इमारत जोडून जैसे थे केल्याची तक्रार

ही बेकायदा इमारत अनधिकृत घोषित करून तिच्यावर पालिकेकडून कारवाई करण्यात आली होती.

Political controversy over Pahalgam banner in Dombivli
डोंबिवलीत पहलगामच्या बॅनरवरून राजकीय वाद, ठाकरे गटाची टीका | Dombivali | Pahalgam Attack

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित आणल्याबद्दल डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानणारे बॅनर झळकले आहेत. मात्र या बॅनरबाजीनंतर…

संबंधित बातम्या