डोंबिवली News

डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील मोठ्या शहरांपैकी एक आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा बहुतांश भाग डोबिवलीमध्ये येतो. मुंबई, ठाणे, नवीमुंबई यांच्यानंतर प्रमुख शहरांमध्ये डोंबिवलीचा समावेश होतो. हे शहर पश्चिमेकडून चोळेगांव, पूर्वेकडून आयरेगाव, दक्षिणेकडून पाथर्ली आणि उत्तरेकडून ठाकुर्ली या गावांनी वेढलेले आहे. डोंबिवलीचा इतिहास फार जुना आहे. इ.स.१०७५ सालच्या राजा हरपाल देव याच्या शिलालेखात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. जेव्हा पोर्तुगीज डोंबिवलीमध्ये आले, तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले तळ उभारले होते. इ.स.१७३० मध्ये पेशवेकाळात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. १९ व्या शतकात डोंबिवलीतील शेतकरी भात पिकवत असत आणि कल्याण ते मुंबई येथे त्याची विक्री करत असत. या ठिकाणी राहणारे मूळ निवासी ‘डोंब’ लोक होते आणि त्यांच्यावरुन या ठिकाणाला डोबिवली असे नाव पडले असे मानले जाते.


सुरुवातीला डोंबिवलीला शहराचे स्वरुप मिळाल्यावर तेथे नगरपालिका तयार करण्यात आली. पुढे ऑक्टोबर १९८३ मध्ये कल्याण आणि डोबिंवली दोन्ही शहरांची मिळून एकच महानगरपालिका स्थापन केली गेली. मुंबईतून मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोक डोंबिवलीमध्ये वास्तव्याला गेले. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो. डोंबिवलीची ओळख असलेल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला १९९९ मध्ये सुरुवात झाली.


डोंबिवली शहराच्या लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळते. लोकसंख्येचा विचार करायला गेल्यास डोंबिवलीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२,४६,३८१ इतकी आहे. हे शहर मुंबई लोकलसाठीही महत्त्वपूर्ण आहे. मुंबईतील बहुतांश नोकरदार वर्ग हा या शहरात वास्तव्याला असल्याने एका प्रकारे हे शहर आर्थिक राजधानी पाठबळ पुरवते असे म्हणता येईल.


Read More
criminal case has filed against land mafia over the illegal ramakant arcade building dombvli
डोंबिवलीत राहुलनगरमधील रमाकांत आर्केडच्या भूमाफियांवर ‘एमआरटीपी’चा गुन्हा

राहुलनगरमध्ये रमाकंत आर्केड ही सात माळ्याची बेकायदा इमारतीत रहिवास झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयाची कारवाईची टांगती तलवार असल्याने भूमाफियांविरुध्द विष्णुनगर पोलीस…

child use crimes thane
गुन्ह्यात लहान मुलांचा वापर चिंताजनक, बाल संरक्षण अधिकारी ॲड. पल्लवी जाधव यांची माहिती

अलीकडच्या काळात गुन्ह्यांमध्ये लहान मुलांचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. लहान मुलांवर झटकन संशय घेतला जात नाही.

Officers illegal constructions Mumbai metropolitan area warning Chief Minister Devendra Fadnavis
मुंबई महाप्रदेश क्षेत्रात बेकायदा बांधकामांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांना तुरुंगाची हवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी डोंबिवलीतील ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणी सुरू असलेल्या चर्चेवर उत्तर दिलं.

Presha and Reshvi Kadam, who are wandering around the forts
डोंबिवलीतील ब्लाॅसम शाळेतील पाच वर्षाच्या जुळ्या बहिणींची १०० गड किल्ल्यांना गवसणी

डोंबिवलीतील स. वा. जोशी प्रांगणातील ब्लाॅसम इंटरनॅशनल शाळेतील पाच वर्ष ११ महिन्यांच्या दोन जुळ्या बहिणींनी मागील अडीच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राच्या…

dombiwali fadke road
डोंबिवलीतील फडके रोड रविवारी शोभायात्रेनिमित्त वाहतुकीसाठी बंद

नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त डोंबिवली श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले जाते. शहर परिसरातील नागरिक अधिक संख्येने या…

Traffic department , Metro , traffic jam,
शिळफाटा रस्त्यावरील कोंडीमुळे वाहतूक विभागाची मेट्रोला नोटीस, रस्त्यालगतच्या शाळांना कोंडीमुळे सुट्टी

शिळफाटा रस्त्यावर विना परवानगी रोधक उभे केल्याने मेट्रो कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पकंज…

Dombivli , illegal buildings, Residents ,
डोंबिवलीतील ५३ बेकायदा इमारतींमधील रहिवाशांची शासनाकडे नियमितीकरणासाठी धाव

५३ बेकायदा इमारतींमधील रहिवाशांनी ज्येष्ठ वास्तुविशारद जी. एन. गंधे यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तु आरेखनकार कुंदन अरूण चौधरी यांनी प्रस्ताव शासनाच्या नगरविकास…

Railways, new office building, Dombivli , Kopar ,
डोंबिवली- कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वेकडून कार्यालयांसाठी नवीन इमारत

डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्थानक प्रबंधक, लोहमार्ग पोलीस ठाणे आणि तिकीट आरक्षण केंद्र कार्यालय नवीन…

dombivli investment fraud marathi news
डोंबिवलीतील पलावा, २७ गावांमधील सात जणांची ७३ लाखांची फसवणूक

रिलायन्स कंपनीत नोकरीला असलेल्या नोकरदाराला घरी असताना समभाग गुंतवणुकीविषयी एक जाहिरात समाज माध्यमातून पाहण्यास मिळाली.

ताज्या बातम्या