डोंबिवली Videos

डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील मोठ्या शहरांपैकी एक आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा बहुतांश भाग डोबिवलीमध्ये येतो. मुंबई, ठाणे, नवीमुंबई यांच्यानंतर प्रमुख शहरांमध्ये डोंबिवलीचा समावेश होतो. हे शहर पश्चिमेकडून चोळेगांव, पूर्वेकडून आयरेगाव, दक्षिणेकडून पाथर्ली आणि उत्तरेकडून ठाकुर्ली या गावांनी वेढलेले आहे. डोंबिवलीचा इतिहास फार जुना आहे. इ.स.१०७५ सालच्या राजा हरपाल देव याच्या शिलालेखात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. जेव्हा पोर्तुगीज डोंबिवलीमध्ये आले, तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले तळ उभारले होते. इ.स.१७३० मध्ये पेशवेकाळात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. १९ व्या शतकात डोंबिवलीतील शेतकरी भात पिकवत असत आणि कल्याण ते मुंबई येथे त्याची विक्री करत असत. या ठिकाणी राहणारे मूळ निवासी ‘डोंब’ लोक होते आणि त्यांच्यावरुन या ठिकाणाला डोबिवली असे नाव पडले असे मानले जाते.


सुरुवातीला डोंबिवलीला शहराचे स्वरुप मिळाल्यावर तेथे नगरपालिका तयार करण्यात आली. पुढे ऑक्टोबर १९८३ मध्ये कल्याण आणि डोबिंवली दोन्ही शहरांची मिळून एकच महानगरपालिका स्थापन केली गेली. मुंबईतून मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोक डोंबिवलीमध्ये वास्तव्याला गेले. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो. डोंबिवलीची ओळख असलेल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला १९९९ मध्ये सुरुवात झाली.


डोंबिवली शहराच्या लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळते. लोकसंख्येचा विचार करायला गेल्यास डोंबिवलीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२,४६,३८१ इतकी आहे. हे शहर मुंबई लोकलसाठीही महत्त्वपूर्ण आहे. मुंबईतील बहुतांश नोकरदार वर्ग हा या शहरात वास्तव्याला असल्याने एका प्रकारे हे शहर आर्थिक राजधानी पाठबळ पुरवते असे म्हणता येईल.


Read More
Kalyan Dombivali Big Violent Fight BJP Leader Office was Attacked by Goons CCTV Footage Goes Viral Rage Over Castist Slur
Kalyan Dombivali Violence: भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात अज्ञातांनी केली तोडफोड, CCTV फुटेज पाहा

Kalyan Dombivali Vidhansabha Elections 2024: डोंबिवली पश्चिमेतील भाजप गुजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयावर तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी…

Diwali Killa Special Exclusive: प्रतापगड, राजगड, लोहगड ते तिकोना, पाहा डोंबिवलीकरांची कला!
Diwali Killa Special Exclusive: प्रतापगड, राजगड, लोहगड ते तिकोना, पाहा डोंबिवलीकरांची कला! प्रीमियम स्टोरी

Diwali Killa Special Exclusive: डोंबिवलीच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाइतकाच प्रसिद्ध असा किल्ले उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न. पाहा भव्य दिव्य प्रतापगड,…

Dombivli Neera Thombare Vegetable seller son became a CA
Dombivli: “त्यानं खूप मेहनत घेतली”; मुलगा CA झाल्यानंतर नीरा ठोंबरेंनी व्यक्त केल्या भावना

डोंबिवलीमधील नीरा ठोंबरे या भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा CA झाला आहे. नीरा ठोंबरे आणि त्यांचा मुलगा योगेश ठोंबरे यांचा एक…

Dombivli news Water shortage in Dombivli society
Dombivli: डोंबिवलीतील हाय प्रोफाईल सोसायटीत पाण्याचा ठणठणाट; नागरिकांनी व्यक्त केला संताप

एकीकडे कल्याण डोंबिवली शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे मात्र शहरांमध्ये पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहे.…

Fire at Indo Amines Company atmosphere of fear in the area
Dombivali MIDC Fire: इंडो अमाईन्स कंपनीला आग, परिसरात भीतीचं वातावरण

जवळपास १५ दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीमधील एका कारखान्यात मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या स्फोटात कारखान्यातील १३ कामगारांचा मृत्यू…

Dombivli MIDC Blast The search for human remains continues on the third day
Dombivali MIDC Blast : तिसऱ्या दिवशीही मानवी अवशेष शोधण्याचे काम सुरूच…

डोंबिवलीत स्फोट झाल्याच्या घटनेला आता दोन दिवस झाले आहेत. यामधे आत्तापर्यंत ११ मृत्यू झाले आहेत. शोधकार्य करत असणाऱ्या एनडीआरएफच्या जवानांना…

Dombivali MIDC Blast Rescue work still in process
Dombivali MIDC Blast: बचावकार्य अद्याप सुरू, मृतांचा आकडा कितीवर?

डोंबिवली ‘एमआयडीसी’तील ‘अमुदान’ या रसायन कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट होऊन त्यात आठ कामगार ठार, तर ६५ जखमी झाले.…

Blast at Amber Chemical Company
Dombivali MIDC Blast: अंबर केमिकल कंपनीत स्फोट, दुकानं, रहिवासी इमारतींनाही फटका

डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी फेझ दोन मधील अंबर केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला. स्फोटामुळे या कंपनीला भीषण आग लागली असून त्याची झळ…