दसरा २०२४

‘दसरा’ किंवा ‘विजयदशमी’ (Dussehra) हा हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण सण आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. दसरा हा या शुभ मुहूर्तांपैकी एक आहे असे मानले जाते. यामुळे दसऱ्याच्या दिवशी कोणतेही काम करायला सुरुवात केली तर ते काम पूर्ण होते अशी अनेकांची आस्था आहे. यामुळे पूर्वीच्या काळी दसऱ्याच्या दिवशी राजे-महाराजे आपल्या सैन्यासह लढाई करण्यास निघत असत असेही म्हटले जाते. क्षत्रियांप्रमाणे व्यापारी मंडळीही याच दिवशी व्यापारासाठी बाहेर पडत, गावची सीमा ओलांडत असत. गावाची, नगराची सीमा ओलांडण्याच्या याच कृतीवर दसऱ्याशी निगडीत “सीमोल्लंघन करणे” ही म्हण प्रचलित झाली असा अंदाज लावला जातो. मुळात सीमोल्लंघन करणे म्हणजे जुन्या गोष्टी सोडून नव्या ध्येयासाठी पुढे जाणे होय.


दसऱ्याला (Dasara)काहीजण विजयदशमी असेही म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दैत्य महिषासुर आणि दुर्गा यांच्यामध्ये युद्ध सुरु होते. या युद्धाचा शेवट दसराच्या दिवशी झाला. अश्विन दशमीच्या दिवशी विजय मिळाल्यामुळेही या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हणत असावेत असे असू शकते. दसऱ्याशी अन्य पौराणिक गोष्टीही संबंधित आहेत. भगवान श्रीराम यांनी राक्षसांचा राजा रावण यांचा वध दसऱ्याला केला होता. यामुळेच दसऱ्याला रावणवध देखील साजरा केला जातो. भारतात त्यातही उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये दसऱ्याला रावणाचे मोठ्ठाले पुतळे तयार करुन ते जाळले जातात. या पुतळ्यांसह आपल्या सर्वांच्या आत असलेली नकारात्मक शक्तीही नाहीशी होवो असा विचार दडलेला आहे असे म्हटले जाते.


दसऱ्याच्या दिवशी पांडव अज्ञातवासातून बाहेर पडले म्हणजेच त्यांनी सीमोल्लंघन केले. अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांनी आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी म्हणून आपापली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवली होती. दसऱ्याला सर्व पांडवांनी ती शस्त्रे बाहेर काढून त्या पाचही भावंडांनी शस्त्रांची पूजा केली. यामुळेच आपल्याकडे विजयादशमीच्या, दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातील मौल्यवान वस्तूंची पूजा केली जाते. पूजा करताना सरस्वती मातेचे आवाहन देखील केले जाते. महाराष्ट्रामध्ये दसऱ्याला आपट्याची पाने एकमेकांना देत शुभेच्छा दिल्या जातात.


Read More
Three youths drowned in lake pit during Devi Visarjan at Savari Tola Complex in gondiya
देवी विसर्जनादरम्यान तलावातील खड्ड्यात पडून तिघांचा मृत्यू

देवी विसर्जनादरम्यान तलावात खोदलेल्या खड्ड्यात तोल गेल्याने तीन तरुणांचा त्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सावरी टोला (रावणवाडी) येथे घडली.

shivsena ubt dasara melava 2024, uddhav thackeray speech, dasra melava photos
19 Photos
Photos : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे जोरदार भाषण, विरोधकांवर सडकून टीका!

Shivsena UBT Dasara Melava Shivaji Park 2024 Photos : मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला.

eknath shinde dasara melava mumbai azad maidan
23 Photos
Photos : ‘असा’ झाला शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा, उबाठा गट व महाविकास आघाडीबद्दल भाषणात नेमकं काय म्हणाले?

Shivsena Dasara Melava Aazad Maidan 2024 Photos : दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना…

baba siddique firing
Who killed Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे ‘या’ गँगचा हात; आरोपींनी दिली धक्कादायक माहिती फ्रीमियम स्टोरी

Baba Siddique Shot Dead at Bandra Mumbai: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची…

bullion market crowded
दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यभरात सोने खरेदीची लगबग

सोन्याचा भाव आता दहा ग्रॅमला स्थानिक सराफ बाजारात ७६,७०० रुपयांच्या पुढे गेला असला, तरी परंपरेमुळे यंदाही लोकांनी सोनेखरेदी गर्दी केली.

CM Eknath Shinde criticized Mahavikasaghadi over maharashtra politics
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मविआवर हल्लाबोल; म्हणाले, “मला हलक्यात घेऊ नका…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून मविआवर टीका केली आहे. “माझी दाढी त्यांना खुपतेय. अरे होती दाढी म्हणून तुमची…

aaditya thackeray dasara melawa speech
Video: “ते चष्मा खाली करून बोलणारे…”, म्हणत आदित्य ठाकरेंनी केली ‘या’ मंत्र्यांची नक्कल; एकनाथ शिंदेंचीही करून दाखवली मिमिक्री!

आदित्य ठाकरे म्हणाले, “मी आज मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांना सांगतोय की याद राखा जर तुम्ही या भ्रष्टाचाराच्या कागदांवर सही केली…

Uddhav Thackeray Dasara Melava 2024
Uddhav Thackeray : “मला दिल्लीकरांची पर्वा नाही, त्यांना गाडून भगवा फडकवणार”, दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

Uddhav Thackeray Dasara Melava 2024: दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुतीसह भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला.

On the occasion of Dussehra more than three and a half thousand vehicles have been registered in the transport department vasai news
दसऱ्याच्या निमित्ताने वाहन खरेदी जोरात; परिवहन विभागात साडेतीन हजाराहून अधिक वाहनांची नोंदणी ; ११ कोटी ९४ लाखांचा महसूल

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. यावर्षी पालघर जिल्ह्यात दसऱ्याच्या निमित्ताने परिवहन विभागात ३ हजार ६८१…

Eknath Shinde
Eknath Shinde : “आम्ही घासून-बसून नव्हे तर ठासून…”, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना चिमटा

Eknath Shinde Dasara Melava : शिवसेनेने (शिंदे) यंदाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेतला.

संबंधित बातम्या