जेव्हा एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध वापरकर्ते वस्तू किंवा सेवांचे उत्पादन, वितरण करतात, व्यापार करतात किंवा त्या गोष्टीचा उपभोग घेतात, तेव्हा ते ज्या व्यवस्थेमध्ये असतात. त्या व्यवस्थेला अर्थव्यवस्था (Economy)असे म्हटले जाते. यामध्ये सामान्य नागरिक, उद्योग, संस्था आणि सरकार यांचा समावेश होतो. अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार, सप्टेंबर २०२२ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती. विकसनशील देश असूनही आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाकिस्तान, श्रीलंका सारख्या देशांपेक्षा चांगल्या स्थितीमध्ये आहे.
भारतीय अर्थव्यवस्ठेमध्ये (Indian Economy) शेतीपासून मोठमोठ्या उद्योगांचा समावेश होतो. क्रयशक्तीच्या समानतेचा निष्कर्ष लावल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. अर्थव्यवस्थेचा संबंध आपल्या आसपासच्या प्रत्येक वस्तू आणि सेवा यांच्याशी येत असतो. राष्ट्रीय उत्पन्न आणि खर्च हे भाग देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असतात.Read More
आर्थिक स्थिती सावरण्यासाठी अर्थशास्त्रज्ञांची बैठक बोलावून त्यांच्या सूचना ऐकण्याचे औदार्य पंतप्रधानांनी दाखवले, पण विषमता आणि कमी उत्पादन- कमी मागणी यांमागची…
जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ आणि लेखक रुचिर शर्मा यांच्याकडून वर्षाच्या सुरुवातीस व्यक्त केली जाणारी जागतिक अर्थव्यवस्थेसंबंधी भाकिते बहुप्रतीक्षित आणि रंजक असतात.
निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे मुंबई महापालिकेने चालू आर्थिक वर्षात विकासकामांवर होणाऱ्या भांडवली खर्चासाठी भरघोस तरतूद केली होती, मात्र डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत…
विद्यामान २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ६.४ टक्क्यांपर्यंत मंदावेल, असे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) मंगळवारी प्रसिद्ध…
मासिक आधारावर, पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनांतील वाढ ऑक्टोबर २०२४ मध्ये नोंदवलेल्या ३.७ टक्क्यांच्या तुलनेत काहीशी विस्तारली इतकाच या आकडेवारीने दिलेला दिलासा…