एकनाथ खडसे News
एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. तपूर्वी, ते भारतीय जनता पार्टीतील सक्रिय नेते होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत महसूल, पशू संवर्धन, दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादनशुल्क आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून काम केलं आहे. कोथळी गावचे सरपंच बनून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. २००९ ते २०१४ या कालावधीत ते महाराष्ट्र विधानसभेत भाजपातर्फे विरोधी पक्षनेते होते. २१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि २३ ऑक्टोंबर २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पक्षप्रवेश केला.
आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची राष्ट्रवादी सोडली असून लवकरच ते भारतीय जनता पक्षात म्हणजेच स्वगृही परतणार आहेत. परंतु, त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्यापही निघालेला नाही. १९८९-१९९० विधानसभा निवडणुकीत खडसे पहिल्यांदा एदलाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर १९९० ते २०१४ पर्यंत खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून अपराजित राहिले आहेत.
Read More