एकनाथ शिंदे Videos
एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं, त्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर होते. आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री हे पद देण्यात आलं आहे. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते ठरले.
एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाबळेश्वरमधील अहिर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यातील महापालिकेच्या एका शाळेत झालं आहे. वयाच्या २० व्या वर्षी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यामुळे शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनाच आपले राजकीय गुरू मानतात. त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणआत सक्रीय असून ते कल्याण लोकसभेचे खासदार आहेत.
Read More