Associate Sponsors
SBI

निवडणूक २०२४ Photos

केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक जाहीर केली. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात तर झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक जाहीर केली. या दोन्ही राज्यातील निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. याआधी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी दोन्ही राज्याचे निकाल जाहीर झाले. हरियाणामध्ये सर्व ९० जागांसाठी एकाच टप्प्यात ५ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले.


हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) सलग तिसऱ्यांदा विजय मिळाला. भाजपाने राज्यात सर्वाधिक ४८ जागा जिंकल्या, तर काँग्रेस (INC)ने ३७ जागांवर विजय मिळविला. इंडियन नॅशनल लोक दल (INLD) पक्षाला २ आणि अपक्ष उमेदवाराच्या वाट्याला तीन जागा आल्या.


जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या होत्या. राज्यातील ९० विधानसभा मतदारसंघात १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले. तीन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स (NC) सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. या पक्षाने सर्वाधिक ४२ जागा जिंकल्या. तर पक्षाबरोबर आघाडीत असलेल्या काँग्रेसला सहा, सीपीएम पक्षाला एक जागा जिंकता आली. कलम ३७० हटवल्यानंतर झालेल्या या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २९ जागा जिंकता आल्या.


तसेच याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA)ला तिसर्‍यांदा सत्ता स्थापन केली. ४ जून २०२४ रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, ज्यामध्ये एनडीएला २९२ जागांवर विजय मिळाला. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेस पक्षाने ९९ जागा जिंकल्या.


लोकसभेच्या ५४३ जागांसाठी लोकसभा निवडणूक २०२४ ही एकूण सात टप्प्यांमध्ये घेण्यात आली. १६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे, तर १ जून रोजी अखेरच्या टप्प्याचे मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर करण्यात आला.


Read More
Jammu Kashmir election result
15 Photos
Jammu Kashmir Election Result : मतमोजणीत काँग्रेस पुढे, भाजपाही मजबूत स्थितीत! पाहा Photos

जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या 90 जागांसाठी आज निकाल जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीमध्ये ओमर अब्दुल्ला,…

Political Battle in Julana
11 Photos
Haryana Election Results: कुस्तीपटू विनेश फोगट यांच्या जुलाना मतदारसंघात काय आहे स्थिती, कोण आहे आघाडीवर?

Haryana Assembly Election 2024: जुलाना ही जागा हरियाणातील हॉट सीट मानली जात असून, काँग्रेसने इथे प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगट यांना…

netwoth of vinesh phogat
9 Photos
Julana Seat: जुलाना मतदारसंघातील उमेदवारांची संपत्ती किती; कुस्तीपटू विनेश फोगट, WWE स्टार कविता व कॅप्टन योगेश या तिघांपैकी कोण सर्वात श्रीमंत?

Julana Seat, Hariyana Assembly Election : भारतीय राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती विनेश फोगट यंदा हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.

rahul gandhi latest in j&k election
15 Photos
Rahul Gandhi Speech: जम्मू काश्मीरमध्ये सत्तेत येण्याचा राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास, भाषणातून केंद्रावर केली टीका

जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी काल (४ सप्टेंबर) प्रचारसभेत बोलत होते.

pune Kasba peth mla ravindra dhangekar criticize devendra fadanvis and eknath Shinde
12 Photos
शेतकरी कुटुंबात जन्मलेले रवींद्र धंगेकर करायचे चुन्याचा व्यवसाय, म्हणाले “मी आमदार झालो, हे माझ्या आईला…”

“आमदार झाल्यावर आईची प्रतिक्रिया काय होती?” रविंद्र धंगेकर म्हणतात…

15 Photos
Pune Bypoll Election 2023: पोलीस अधिकाऱ्याची मुलगी बनली चिंचवडची आमदार; जगताप दाम्पत्याची एकूण संपत्ती माहीत आहे का?

Chinchwad Bypoll Election 2023: चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप १३ कोटींच्या मालकीण, जगताप दाम्पत्याची एकूण संपत्ती माहीत आहे?

Mithun Chakraborty political career
10 Photos
माकपा ते भाजपा व्हाया तृणमूल आणि शारदा चिटफंड… मिथुन चक्रवर्तींची अस्थिर राजकीय कारकिर्द!

ऐन निवडणुकांच्या आधी मिथुन चक्रवर्ती भाजपामध्ये गेल्यामुळे पश्चिम बंगालमधलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

ताज्या बातम्या