निवडणूक २०२४ Videos

केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक जाहीर केली. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात तर झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक जाहीर केली. या दोन्ही राज्यातील निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. याआधी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी दोन्ही राज्याचे निकाल जाहीर झाले. हरियाणामध्ये सर्व ९० जागांसाठी एकाच टप्प्यात ५ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले.


हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) सलग तिसऱ्यांदा विजय मिळाला. भाजपाने राज्यात सर्वाधिक ४८ जागा जिंकल्या, तर काँग्रेस (INC)ने ३७ जागांवर विजय मिळविला. इंडियन नॅशनल लोक दल (INLD) पक्षाला २ आणि अपक्ष उमेदवाराच्या वाट्याला तीन जागा आल्या.


जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या होत्या. राज्यातील ९० विधानसभा मतदारसंघात १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले. तीन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स (NC) सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. या पक्षाने सर्वाधिक ४२ जागा जिंकल्या. तर पक्षाबरोबर आघाडीत असलेल्या काँग्रेसला सहा, सीपीएम पक्षाला एक जागा जिंकता आली. कलम ३७० हटवल्यानंतर झालेल्या या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २९ जागा जिंकता आल्या.


तसेच याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA)ला तिसर्‍यांदा सत्ता स्थापन केली. ४ जून २०२४ रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, ज्यामध्ये एनडीएला २९२ जागांवर विजय मिळाला. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेस पक्षाने ९९ जागा जिंकल्या.


लोकसभेच्या ५४३ जागांसाठी लोकसभा निवडणूक २०२४ ही एकूण सात टप्प्यांमध्ये घेण्यात आली. १६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे, तर १ जून रोजी अखेरच्या टप्प्याचे मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर करण्यात आला.


Read More
Maharashtra Assembly Election Announced By Election Commissioner Political Leader Reacted about Election on Social Media
Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीची घोषणा; राजकीय नेत्यांनी दिली प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून सर्वांच लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम…

Aaditya Thackeray criticized Chief Minister eknath Shinde over the postponement of the Senate elections 2024
सिनेट निवडणुकीच्या स्थगितीवरून आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर बोचऱ्या शब्दांत टीका

सिनेट निवडणुकीच्या स्थगितीवरून आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर बोचऱ्या शब्दांत टीका

Senate election 2024 Aditya Thackeray criticized government Live
Aditya Thackeray Live: सिनेट निवडणूक, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल Live

सिनेटच्या निवडणुकीला दोन दिवस बाकी असताना मुंबई विद्यापीठ प्रशासनाने ही निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरूव ठाकरे गट आक्रमक…

Constitutional expert Ulhas Bapats opinion about one country one election
Ulhas Bapat: एक देश एक निवडणुकीबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी मांडलं स्पष्ट मत

एक देश एक निवडणूक हा विषय क्लिष्ट आहे. एका वेळी निवडणूक घेतली तर ताण येऊ शकतो, असं मत घटनातज्ज्ञ उल्हास…

Anil Parbas victory in graduate elections Anil parab gave a first reaction
Anil Parab won Graduate Constituency: पदवीधर निवडणुकीत अनिल परबांचा विजय, दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबईतील पदवीधर, शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा चार मतदारसंघात निवडणूक झाली होती. मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना ठाकरे…

ताज्या बातम्या