
मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.
आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.