फारूख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३७ रोजी जम्मू आणि काश्मीरची तत्कालीन राजधानी श्रीनगर येथे झाला. ते ‘जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स’ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.
१९८२ सालानंतर विविध प्रसंगी त्यांनी तीन वेळा जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत ते केंद्रीय मंत्री होते. फारख अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीरचे (Jammu and Kashmir) पहिले निर्वाचित मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांचे पूत्र आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे वडील आहेत.
जयपूरच्या एसएमएस वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर ते वैद्यकीय सरावासाठी ब्रिटनला देखील गेले होते. अब्दुल्ला हे १९८० च्या सार्वत्रिक निवडणुकीत श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले होते. Read More
Jammu and Kashmir Election Results: जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांना दिलेल्या अतिरिक्त अधिकारांमुळे जनादेशाचा अवमान होऊ शकतो, असा आरोप काँग्रेस,…