फुटबॉल (Football) हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलला काही देशांमध्ये सॉकर असेही म्हटले जाते. या खेळामध्ये ११ खेळाडूंचा समावेश असतो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ ठराविक वेळेमध्ये सर्वाधिक गोल करतो, तो संघ विजेता ठरतो.
भारतामध्ये १८ व्या शतकाच्या शेवटी हा खेळ पोहोचला. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये फुटबॉल मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो.
भारतामध्ये या खेळाचे महत्त्व वाढावे आणि चांगले फुटबॉलपटू आपल्या देशामधून यावेत यासाठी १९३७ साली ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. फिफा, कोपा अमेरिका या फुटबॉलच्या काही स्पर्धा जगभरामध्ये फार लोकप्रिय आहे. भारतामध्ये फुटबॉलची मोठी क्रेझ पाहायला मिळते.Read More
देशातील तरुण लोकसंख्येला शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यायामास प्रेरित करण्यासाठी सौदी अरेबियाने खेळाला महत्त्व देण्यास सुरुवात केली. क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून पर्यटनाला…
अमाद डिआलोने (९०व्या मिनिटाला) झळकावलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये मँचेस्टर सिटी संघावर २-१ असा विजय मिळवला.
Neymar comeback : स्टार फुटबॉलपटू नेमारच्या डाव्या गुडघ्यात मेनिस्कस आणि अँटीरियर क्रूसिएट लिगामेंट फाटल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. आता त्यांनी तब्बल…
तारांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसीने झळकावलेल्या हॅट्ट्रिक च्या जोरावर अर्जेंटिनाने दक्षिण अमेरिका विश्वचषक फुटबॉल पात्रता सामन्यात बोलिव्हियावर ६-० असा विजय मिळवला.
फुटबॉलविश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बॅलन डी’ओर पुरस्काराची नामांकन यादी जाहीर करण्यात आली असून २००३ सालानंतर प्रथमच लिओनेल मेसी आणि ख्रिास्तियानो…