गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
महाराष्ट्रातील एका आदिवासी गावातील गोंडी भाषा शिकविणाऱ्या शाळेला प्रतिदिन दहा हजार रुपयांचा दंड होतो. आणि नाशिक विभागातील मागासवर्गीयांच्या वसतिगृहातील एका…
गौण खनिज उत्खननातून जिल्हा खनिज प्रतिष्ठानला मिळणाऱ्या निधीचा त्याच परिसरातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बाधित भागाच्या विकासासाठी वापर करण्याचे धोरण आहे.