गणेश चतुर्थी २०२४ News
लहान मोठ्यांसह सगळेच बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालेले असतात. दरवर्षी गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2024) देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. याला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असेही म्हणतात. हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्मोत्सव (Ganesh Utsav) म्हणून साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची ख्याती संपूर्ण भारतभर पाहायला मिळते. दरम्यान २०२४ ला गणपत्ती बाप्पा कधी आपल्या घरी विराजमान होणार आहेत हे तुम्हाला माहितीये का ?
हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२४ मध्ये बाप्पा सप्टेंबरच्या सुरुवातीला आपल्या घरी येतील. ७ सप्टेंबरला बाप्पाचे आगामन होईल तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2024) असेल.
Read More