गणेश नाईक हे भाजपाचे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. गणेश नाईक यांचा जन्म १५ सप्टेंबर १९५० चा आहे. ८० च्या दशकात गणेश नाईक यांनी राजकारणाला सुरुवात केली. आधी युनियनचे लीडर, मग आक्रमक कामगार नेते म्हणून नवी मुंबईत त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर गणेश नाईक यांनी शिवसेनेतून आपला राजकीय प्रवास सुरू केला. गणेश नाईक हे मूळ ठाणेकर आहेत. १९९० मध्ये गणेश नाईक पहिल्यांदा आमदार म्हणून झाले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर राज्यात युतीची सत्ता आली आणि गणेश नाईकांना पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. याचवेळी ते ठाण्याचे पालकमंत्रीही झाले होते. १९९९ गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा आमदार झाले. पण २०१४ च्या निडवणुकीत त्यांचा पराभव झाला. ऑक्टोबर २०१९ मध्ये गणेश नाईक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.