गणेश नाईक Videos

गणेश नाईक हे भाजपाचे ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. गणेश नाईक यांचा जन्म १५ सप्टेंबर १९५० चा आहे. ८० च्या दशकात गणेश नाईक यांनी राजकारणाला सुरुवात केली. आधी युनियनचे लीडर, मग आक्रमक कामगार नेते म्हणून नवी मुंबईत त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर गणेश नाईक यांनी शिवसेनेतून आपला राजकीय प्रवास सुरू केला. गणेश नाईक हे मूळ ठाणेकर आहेत. १९९० मध्ये गणेश नाईक पहिल्यांदा आमदार म्हणून झाले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर राज्यात युतीची सत्ता आली आणि गणेश नाईकांना पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. याचवेळी ते ठाण्याचे पालकमंत्रीही झाले होते. १९९९ गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा आमदार झाले. पण २०१४ च्या निडवणुकीत त्यांचा पराभव झाला. ऑक्टोबर २०१९ मध्ये गणेश नाईक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.


Read More
Diva Illegal Building Case Forest Minister ganesh naik gave a big information
दिवा अवैध बांधकाम प्रकरण: पेट्रोल घेऊन आंदोलन, शेवटी मिळाला दिलासा; मंत्र्यांचे पालिकेला आदेश

Diva Illegal Building Case: कल्याण – डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतीमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून येथील नागरिकांना…

biggest update in Dombivali Illegal Building Case Forest Minister Ganesh Naik gave deatail information
डोंबिवली अवैध इमारत प्रकरणात मिळणार दिलासा? जनता दरबारात काय घडलं?

Dombivali Illegal Building Case: ठाणे येथील खारकर आळी भागातील रघुवंशी हॉल मध्ये सोमवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला.…

ताज्या बातम्या