लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सुरुवात केली. त्याआधी गणेशोत्सव हा सण घरगुती स्वरुपामध्ये साजरा केला जात असे. पारतंत्र्यामध्ये लोकांनी एकत्र यावे यासाठी टिळकांनी ही प्रथा सुरु केली. मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या महानगरांसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव उत्साहामध्ये साजरा केला जातो. मुंबईमधील चाकरमनी खास गणपतीसाठी कोकण गाठतात. करोना काळामध्ये गणेशोत्सवावर काही प्रमाणामध्ये बंधने आल्याने गेल्या दोन वर्षांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण तुलनेने वाढले आहे.
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात होते. तेव्हा लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी आणली जाते. काही दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturthi) दिवशी घरी जायला निघतात. गणेशोत्सवामध्ये एकूणच चैतन्याचा वातावरण असते. २०२३ मध्ये १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी येणार आहे.Read More
गणेशोत्सव मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी १३७ सार्वजनिक मंडळांवर आणि प्रखर लेझर प्रकाश किरणांचा वापर केल्याप्रकरणी १० मंडळांवर कारवाई करण्यात आली.
गणेशोत्सव कालावधीमध्ये कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ९७ सराईत गुन्हेगारांना तडीपार केले होते.