गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होते. हा भारतातील सर्वांत लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक सण आहे. त्याला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी गणेशाचा जन्म झाला, असे मानले जाते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा हा १० दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत मनोभावे, उत्साहाने व आनंदात साजरा होतो. घरोघरी आणि मंडळांमध्ये गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. ढोल-ताशाच्या गजराता बाप्पाचे स्वागत केले जाते. गणेशोत्सवात सर्वत्र उत्साहाचे आणि चैतण्याचे वातावरण असते. Read More